

तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या विलीनीकरणावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर निशाणा साधलाय.शहा कुठून कुठून असे पक्ष निर्माण करतात आणि त्यांना राजकीय पटलावर आणतात, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 20 खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले. या सर्व खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि 'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया' या पक्षात विलीन होत असल्याचं पत्र दिलं. इतकचं काय तर या बंडखोर गटानं थेट भाजपप्रणित एनडीए आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र,तृणमूलच्या या बंडखोरांनी स्वतःला 'खरी टीएमसी' न म्हणता, एका दुसऱ्याच पक्षात विलीनीकरण का केलं? यामागे सर्वोच्च न्यायालयाचे जुने निर्णय आणि कायदेशीर पेच कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.
पक्षांतराचा कायदा आणि कायदेशीर पेच
गटाच्या फुटीला कायदेशीर मान्यता नाही
विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक
मूळ राजकीय पक्षाचाच व्हिप सर्वोच्च असतो
20 खासदारांचं लोकसभेत दोन-तृतीयांशपेक्षा जास्त संख्याबळ
खासदारकी वाचवण्यासाठी NCPI पक्षात विलीनीकरण
मुळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल पाहता, पक्षातील फुटीर गटाला आता कायदेशीर मान्यता मिळत नाही... मूळ राजकीय पक्षाचाच व्हिप सर्वोच्च असतो. त्यामुळे खासदारकी वाचवायची असेल, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन-तृतीयांश बहुमताने दुसऱ्या पक्षात विलीन होणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय उरतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात जाण्याची भीती असल्यानेच तृणमूलच्या फुटीर गटाने एका छोट्या पक्षात का होईना, आपल्या गटाचं विलीनीकरण केल्याची दाट शंका आहे..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.