Dalai Lama : चीनला परतण्यात काहीच अर्थ नाही...दलाई लामांच्या वक्तव्यानं चीनला मिरच्या झोंबणार

चीनमध्ये परतण्यात काहीही अर्थ नाही. मला भारत आवडतो, असं दलाई लामा म्हणाले.
Dalai Lama
Dalai LamaSAAM TV
Published On

Dalai Lama On Tawang face-off : भारत जवान आणि चीन सैनिकांमध्ये अरूणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये झालेल्या झटापटीच्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. चीनसोबतच्या तणावावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गदारोळ झाला. त्याचवेळी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचं याच घटनेवर केलेले एक वक्तव्य समोर आलं आहे. (Latest Marathi News)

चीनमध्ये परतण्यात काहीही अर्थ नाही. मला भारत आवडतो. कांगडा पंडित नेहरूंची पसंत आहे. या ठिकाणी माझं कायमस्वरुपी निवास आहे, असे दलाई लामा म्हणाले.

Dalai Lama
India-China: चीनची तवांगवर वाकडी नजर का? तवांग ताब्यात गेलं तर चीन अख्खं राज्य गिळण्याचा धोका

हिमाचल प्रदेशातील कांगडामध्ये दलाई लामा बोलत होते. तवांग घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनला काही संदेश द्याल का असं विचारलं असता, ते म्हणाले की, काही गोष्टींत सुधारणा होत आहेत. युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये चीन अधिक लवचिक आहे. मात्र चीनमध्ये परतण्यात काहीच अर्थ नाही. मला भारत आवडतो.' (India-China)

Dalai Lama
Rahul Gandhi vs BJP: भारत-चीन झटापटीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं; भाजपचा पलटवार

तवांगमध्ये काय घडलं होतं?

तत्पूर्वी ९ डिसेंबरला तवांगमधील यांग्त्से परिसरात चिनी सैनिकांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आगळीक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचवेळी भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना त्यांच्या चौक्यांजवळ जाण्यास भाग पाडले होते.

भारतीय जवानांचं सरकारनंही कौतुक केलं होतं. भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे प्रयत्न हाणून पाडले, त्यांना पिटाळून लावले, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. या झटापटीत दोन्हीकडील सैनिक जखमी झाले होते. राजनाथ सिंह यांनीही याबाबत माहिती दिली होती. या झटापटीत कोणत्याही जवानाला गंभीर दुखापत झाली नाही. काही जवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे सिंह यांनी सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com