India-China: चीनची तवांगवर वाकडी नजर का? तवांग ताब्यात गेलं तर चीन अख्खं राज्य गिळण्याचा धोका

चीनला तवांग आपल्या ताब्यात का घ्यायचं आहे? हे ठिकाण भारतासाठी इतके खास का आहे? असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
India China
India China- Saam Tv
Published On

India-China: चीनकडून नेहमीच LACवर काही ना काही कुरघोड्या सुरु असतात. मात्र भारतीय सैनिक मोठ्या शौर्याने चीनच्या या कटाचा सामना करत असतात. LAC वर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये वारंवार चकमक होत आहे. 9 डिसेंबर रोजी देखील चिनी सैनिकांनी तवांग भागात हल्ला केला मात्र भारतीय जवानांनी तो धुडकावून लागला. मात्र चीनला तवांग आपल्या ताब्यात का घ्यायचं आहे? हे ठिकाण भारतासाठी इतके खास का आहे? असा प्रश्न देखील उपस्थित होतो. (India China)

तवांगचं महत्त काय?

तवांग अरुणाचल प्रदेशात सुमारे 17 हजार फूट उंचीवर आहे. हे ठिकाण लष्करासाठी रणनिती आखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच दोन्ही देशांना येथे भावनिक जोडही आहे. याचे कारण म्हणजे 1962 च्या भारत-चीन युद्धात चीनने तवांग ताब्यात घेतले होते. मात्र नंतर ते चीनने हा परिसर खाली केला होता. कारण ते मॅकमोहन रेषेत येते. (Latest Marathi News)

India China
India-China Clash : ड्रॅगनची वक्रदृष्टी, ५ घटना अन् जिगरबाज भारतीय जवान; कसा हाणून पाडला चिन्यांचा डाव?

नंतर मात्र चीनने ही मॅकमोहन लाइन मानण्यास नकार दिला. तेव्हापासून हे ठिकाण चीनला हवंय मात्र आजपर्यंत चीन इथे पोहोचू शकलेला नाही. 9 डिसेंबर रोजी चीनने यासाठी पुन्हा प्रयत्न केले पण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. तवांगवर कब्जा करून चीन तिबेटवर तसेच LAC वर लक्ष ठेवू शकणार आहे. यामुळेच चीनला ही जागा पुन्हा बळकावायची आहे.

तवांगवर चीनचा ताबा भारतासाठी धोकादायक

भारताच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा इतका महत्त्वाचा का आहे आणि तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. भारतातील दोन पॉईंट्स चीनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. यापैकी एक म्हणजे तवांग आणि दुसरी चंबा घाटी. चंबा घाटी नेपाळ-तिबेट सीमेवर आहे, तर तवांग चीन-भूतान जंक्शनवर आहे. तवांग ताब्यात घेण्यात चीनला यश आले तर तो अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगू शकतो.

1962 च्या युद्धात भारताला याबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांपासून भारत येथे अतिशय वेगाने बांधकाम करत आहे जेणेकरून देखरेखीची पातळी वाढवता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com