Rahul Gandhi vs BJP: भारत-चीन झटापटीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं; भाजपचा पलटवार

भारतीय जवान-चिनी सैनिकांमधील झटापटीवरून राहुल गांधींनी केलेल्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.
Rahul Gandhi vs BJP/file Photo
Rahul Gandhi vs BJP/file PhotoSAAM TV
Published On

India Vs China : चीनचे सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये तवांगमध्ये झालेल्या झटापटीच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरतानाच अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, भाजपनं पलटवार केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या विधानाचा जितका निषेध करता येईल तितका कमी आहे. भारतीय लष्कर शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं काँग्रेससोबत एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्याचं आम्हाला ठाऊक आहे, असा टोलाही नड्डांनी लगावला.

भारतीय जवान डोकलाममध्ये होते त्यावेळी राहुल गांधी हे चिनी दूतावासात त्यांच्या अधिकाऱ्यांना गुपचूप भेटले होते. त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा घटनेवरही प्रश्न उपस्थित केले होते हे आम्हाला ठाऊक आहे. ते भारताची भाषा बोलत नाहीत, असं जेपी नड्डा म्हणाले.

पाकिस्तान जी भाषा करतोय, आम्हीही त्याच भाषेत उत्तर देतो. मी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. देशाबद्दल राहुल गांधींची मानसिकता काय आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसतं, असंही नड्डा म्हणाले. (Latest Marathi News)

राहुल गांधींनी कोणते आरोप केले होते?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी शुक्रवारी भाजपवर आरोप केले होते. चीन युद्धाची तयारी करत आहे. तर भारत सरकार अजून झोपले आहे. धोक्याकडे कानाडोळा केला जात आहे. चीननं २ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. (Rahul Gandhi)

२० भारतीय जवानांची हत्या केली. अरुणाचल प्रदेशात आपल्या जवानांना मारहाण केली जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केले होते. तर भाजपनं या टीकेला उत्तर दिलं. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना पिटाळून लावले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय जवानांचा अभिमान आहे. भारताचे जयचंद राहुल गांधी हे आमच्या वीर जवानांचे मनोधैर्य का कमी करत आहे, असा सवाल भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com