Pakistan : तालिबान सीमा वादावरून एकमेकांना भिडले

तालिबान सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला दोन्ही देशांच्या सीमेवर सुरक्षा कुंपण बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला
Pakistan : तालिबान सीमा वादावरून एकमेकांना भिडले
Pakistan : तालिबान सीमा वादावरून एकमेकांना भिडलेSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : पाकिस्तान अगोदरपासूनच अफगाणिस्तान मधील तालिबानला पाठिंबा देत होता. पण आता तालिबानच (Taliban) पाकिस्तानसमोर उभा ठाकला आहे. तालिबान सैनिकांनी (soldiers) पाकिस्तानी सैन्याला दोन्ही देशांच्या सीमेवर (border) सुरक्षा कुंपण बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी यासंदर्भाविषयी माहिती दिली आहे. जगभरात इस्लामी देश अफगाणिस्तन (Afghanistan) मधील नागरिकांच्या हक्काविषयी चर्चा करण्याकरिता इस्लामाबाद (Islamabad) मध्ये एकत्र आले असताना दोन्ही देशांमधील सीमेवर हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

हे देखील पहा-

अफगाणिस्तान मधील सरकारच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने (Pakistan) सर्वाधिक २,६०० किमी सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. पाकिस्तानने ज्या भागामध्ये कुंपण घातले आहे. त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन सीमांकनालाही आव्हान देण्यात आले आहे. हे कुंपण दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना विभाजित करत असतो. या सीमेवरील घालण्यात आलेले कुंपण हे 'बेकायदेशीर' असल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरझामी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, तालिबानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याला नांगरहारच्या पूर्व प्रांतामध्ये "बेकायदेशीर" कुंपण घालण्यापासून रोखले होते. रविवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. आता सर्व काही सामान्य असल्याचे सांगत सीमेवरच्या वादाच्या घटनेवर अधिक बोलणे त्यांनी टाळले आहे. याचवेळी याविषयी पाकिस्तानी लष्कराला विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

Pakistan : तालिबान सीमा वादावरून एकमेकांना भिडले
भाजपकडून मनपा निवडणूकीची तयारी; नागपूरात ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारंच

सोशल मीडियावर (Social media) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये (video) तालिबानी सैनिक पाकिस्तानी सैनिकांकडून काटेरी तारांचे बंडल जप्त करताना दिसून आले आहेत. व्हिडीओत, एक वरिष्ठ अधिकारी सुरक्षा चौक्यांवर तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना परत सीमेवर कुंपण घालण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा देताना दिसून येत आहे. दोन्ही देशाच्या सीमेवरुन तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्या ठिकाणची स्थिती तणावाची झाली आहे, अशी माहिती २ तालिबानी अधिकाऱ्यानी दिली आहेत.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तान मधील सीमाभाग कुनार प्रांतामध्ये गोळीबारी करण्यात आला आहे. परंतु, सीमावादावरुन अन्य कोणत्या कारणावरुन गोळीबार करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गोळीबारानंतर अफगाण सैन्य हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रांतात गस्त घालण्यात येत आहे, असेही त्या २ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या अगोदर अमेरिका समर्थित अफगाण सरकार आणि पाकिस्तान यांच्यात संबंध चांगले नव्हते. यामुळे सीमाभागावर तारांचे कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, अफगाणिस्तान सत्तेची सूत्रं तालिबानच्या हाती गेल्यानंतर पाकिस्तानकडून हे काम सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com