बापरे ! बघता बघता नदीत वाहून गेली शाळा (पहा Video)

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. वृत्तानुसार, हा व्हिडिओ बिहारमधील (Bihar) आहे.
बापरे ! बघता बघता नदीत वाहून गेली शाळा (पहा Video)
बापरे ! बघता बघता नदीत वाहून गेली शाळा (पहा Video)Twitter/@manishndtv
Published On: 

कटिहार : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. वृत्तानुसार, हा व्हिडिओ बिहारमधील (Bihar) आहे. बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बिहारमध्ये दरवर्षी पहिल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होत असते.

बापरे ! बघता बघता नदीत वाहून गेली शाळा (पहा Video)
विकी- कतरिना यांनी हळदी समारंभातील खास फोटो केले शेअर...

तर, सध्या अमदाबाद ब्लॉकच्या झब्बू टोला येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. जेथे सुधारित माध्यमिक शाळेच्या झब्बू टोलाच्या दोन खोल्या गंगेच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. सुदैवाने विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

हे दृश्य खूपच अंगावर काटा येतो. नदीच्या काठावर बांधलेल्या शाळेचे पीलर पावसामुळे कोसळत आहेत हे व्हिडिओत दिसत आहे. यादरम्यान हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. एका हिंदी वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

त्याचवेळी व्हिडिओमधून दिसत आहे की, काही लोक आसपासच्या गावकऱ्यांना दूर जाण्यास सांगत आहेत. गेल्या रविवारी बिहारमध्ये ‘जवाद’ (Jawad Cyclone) मुळे मुसळधार पावसाचा फटका बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.