आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या भावात आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ४५,२४० रुपये इतका आहे. गेल्या ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूचा भाव ४५,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद करण्यात आली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
हे देखील पहा-
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्काने सोन्याचे दागिन्यांचे भाव भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला आहे. मुंबई मध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे भाव ४४,४४० असेल.
तर २४ कॅरेट सोन्याचे भाव ४७,५८० रुपये असणार आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे भाव ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचे भाव ४६,२४० रुपये इतका असणार आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा भाव ६०६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या भावामध्ये काहीच फरक नाही.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.