Bihar News
Bihar NewsSaam Tv

Bihar : अरे बापरे! भुयार खोदून अख्खं रेल्वे इंजिनच पळवलं अन् विकलं सुद्धा; अजब चोरीची गजब स्टोरी वाचा

बिहारमध्ये एक अनोखी चोरी उघड झाली आहे.
Published on

Bihar News : बिहारमध्ये (Bihar) सध्या एका अनोख्या चोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. रोहतास येथे 500 टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक मोठी चोरी झाली आहे. या चोरीबद्दल ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

या चोरट्यांनी भुयार खोदून रेल्वेचं अख्ख इंजिनच पळवल्याची घटना उघड झाली आहे. इतकंच नाही तर या चोरांनी ते इंजिनच विकलं सुद्धा. त्यामुळे या अजब चोरीची घटना ऐकून पोलिसही चक्रावले आहे. मुझफ्फरपूर येथे भंगाराच्या दुकानात एका बॅगमध्ये इंजिनचे काही सुटे भाग सापडले. त्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली होती. त्यानंतर माहितीच्या आधारे मुझफ्फरपूर येथील प्रभात कॉलनीतील भंगाराच्या गोदामात जाऊन इंजिनच्या सुटे भाग भरून ठेवलेल्या 13 गोण्या जप्त केल्या.

Bihar News
Resume Writing Tips : रेझ्युमे बनवताना 'या' 6 गोष्टी लक्षात ठेवा, हमखास नोकरी मिळेल !

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक भुयार सापडला आहे. ज्यामधून हे चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट गोण्या भरून घेऊन जायचे.रेल्वे अधिकाऱ्यांना तर त्याबाबतची काहीच माहिती नव्हती, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

काही दिवसांपूर्वी पूर्णि या जिल्ह्यातही अशीच एक चोरी घटना घडली होती. चोरांनी विंटेज मीटर गेज स्टीम इंजिन विकलं होतं. स्थानिक रेल्वे स्थानकात हे इंजिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र, चौकशी केल्यानंतर हे इंजिन चोरी गेल्याचं दिसून आलं आहे. समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजिनियरकडून देण्यात आलेल्या बनावट पत्राच्या आधारे हे इंजिन विकण्यात आलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी बिहारच्या उत्तर पूर्वेकडील अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील पुलाचं कुलूप चोरांनी उघडलं होतं. त्यानंतर या पुलाचे काही भाग चोरांनी गायब केले होते. त्यानंतर आता हा दुसरा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com