वृत्तसंस्था: चीनमधील ग्वांगझूजवळच अपघात झालेल्या चायना इस्टर्न ७३७-८०० विमानामधील सर्व १३२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. चीनच्या (China) नागरी उड्डयन प्रशासनाचे उपसंचालक हू झेनजियांग यांनी या विषयी माहिती दिली आहे की, विमानात (Plane ) सर्वांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांचे मृतदेह सापडले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.
हे देखील पहा-
चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, हू झेजियांग यांनी सांगितले आहे की, तपास पथकाचे ऑपरेशन (Operation) जवळपास पूर्ण झाले आहे. तपासकर्त्यांनी डीएनए चाचणीद्वारे १२० मृतांची ओळख पटवली आहे. तपास पथकाला विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. पहिला ब्लॅक बॉक्स ३ दिवसांच्या प्रयत्नानंतर सापडला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या ४ दिवशी सापडला आहे.
चीनच्या कुनमिंग शहरामधून २१ मार्चला ग्वांगझूला जाणारे चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोइंग ७३७ प्रवासी विमान नैऋत्य चीनमध्ये कोसळले आहे. अपघाताच्या वेळी विमानामध्ये असलेल्या १३२ प्रवासी आणि कर्मचारी सर्वांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने कारवाई करत शोध आणि बचाव मोहिमेचे आदेश दिले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तातडीने तपास करण्यात येत असून विमान वाहतूक क्षेत्र आणि लोकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.