MP: माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना एक वर्षाची शिक्षा; उज्जैनमधील 'तो' राडा अंगाशी

२०११ मधील मारहाण प्रकरणात प्रत्येकी १ वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली
Digvijaya Singh
Digvijaya SinghSaam Tv
Published On

इंदूर: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh), माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह ६ आरोपींना २०११ मधील मारहाण प्रकरणात प्रत्येकी १ वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उज्जैन येथे ही घटना घडली होती. इंदूर येथील विशेष न्यायालयाने या खटल्यात ११ वर्षांनंतर शनिवारी निकाल दिला आहे. उज्जैन येथे १७ जुलै २०११ या दिवशी भाजप (BJP) युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते. दिग्विजय सिंह यांचा ताफा जात असताना जोरदार निदर्शने करण्यात आली होती.

हे देखील पहा-

दिग्विजय यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली होती. यावेळी दिग्विजय सिंह आणि माजी खासदार (MP) प्रेमचंद गुड्डू यांच्या समक्ष काँग्रेस आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद भडकला होता. त्या वादाचे पर्यवसन हाणामारीमध्ये होऊन भाजयुमो कार्यकर्ता रितेश खाबिया याला बेदम मारहाण (Beating) करण्यात आली होती. याप्रकरणी लोकप्रतिधींवर दाव्यांसाठीच्या इंदूर (Indore) येथील विशेष न्यायालयामध्ये खटला चालू होता आणि न्यायालयाने निकाल सुनावला आहे.

Digvijaya Singh
वाळू माफियांचा माजी सरपंचासह तिघांवर प्राणघातक हल्ला; हल्यात 3 गंभीर जखमी

न्यायालयाने दिग्विजय सिंह, प्रेमचंद गुड्डू यांच्याबरोबरच ६ आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली तर ३ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींनी प्रत्येकी ५ हजार रुपये दंड भरल्यानंतर २५- २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा ३ वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांना जामीन मिळाला असल्याचे सरकारी वकील विमलकुमार मिश्रा यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह आणि गुड्डू हे शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत. तशी माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com