शिवाजी काळे -
नवी दिल्ली: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दाखल केली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय आम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी ४ आठवड्याचा अवधी द्यावा अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून आयोगाकडे करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रे बनावट आहेत याचा पुरावा म्हणून एक मेल देखील ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे? या संदर्भात आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपली कागदपत्रं सादर केली आहेत.
पाहा व्हिडीओ -
उद्या शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा महत्वाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगात कागदपत्र सादर केली तर शिंदे गटाच्या वतीने वकील उत्सव त्रिवेदी यांनी कागदपत्र सादर केली आहेत.
दरम्यान, शिंदे गटाने आत्तापर्यंत आपल्याकडे असणाऱ्या, विधानसभा आमदार 40, लोकसभा खासदार 12, शिवसेना प्राथमिक सदस्य 1,66,764, शिवसेना पदाधिकारी 144, शिवसेना राज्यप्रमुख 11 अशी कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. तर ठाकरे गटाने आत्तापर्यंत 180 राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाहीत.
त्यामुळे उर्वरीत कागदपत्रे उद्या दुपारपर्यंत सादर करण्याच्या सुचना आयोगाने ठाकरे गटाला दिल्या आहेत. अशातच आता शिंदे गटाने दिलेली प्रतिज्ञापत्रे बनावट असून आम्हाला कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ आठवड्याचा अवधी द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे या मेलच्या आधारे निवडणूक आयोग आपला निर्णय देणार की आहे तोच निर्णय कायम ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप -
शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह कोणाचे? या संदर्भात आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपली कागदपत्रं सादर केली. मात्र, ठाकरे गटाने आज शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रावर आक्षेप घेत शिंदे गटाची कागदपत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाला केलेल्या इमेलमध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदवला आहे. कागदपत्रे दाखल केले असताना उद्या पर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले ? असा सवालच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला केला आहे.
काय म्हटलंय ठाकरे गटाने?
कागदपत्रे दाखल केले असताना उद्या पर्यंत म्हणणे मांडण्याचे पत्र कसे काय पाठवले ?
आयोगाने केलेले निरिक्षण बेकायदा असून निवडणूक आयोगाने पत्र पाठवणे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.