जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्याचा पर्दाफाश; शस्त्र आणि दारूगोळा जप्त

भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या दरम्यान दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला
Jammu Kashmir
Jammu Kashmir Saam Tv

वृत्तसंस्था: जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ येथील जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या दरम्यान दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लष्कराने दहशतवादी (Terrorist) लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की, लष्कराच्या तुकड्या आणि जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) रविवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील नूरकोट भागात संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. या कारवाईच्या दरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तसेच शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये २ मॅगझिनसह २ एके-४७ रायफल आणि ६३ राउंड, एक २२३ बोअर एके बंदूक, २ मॅगझिन, २० राऊंड आणि १ मॅगझिनसह १ चायनीज पिस्तूलाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, गुप्त माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी उशिरा सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या दरम्यान कोणालाही अटक (Arrested) करण्यात आली नाही.

Jammu Kashmir
प्रवीण दरेकर पोलीस ठाण्यात दाखल; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रोज चकमक होत आहे. याबरोबरच सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ले (Grenade attacks) देखील सातत्याने वाढत आहेत. या दरम्यान काश्मीर मधील एका महिलेचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. या महिलेने सीआरपीएफ चेक पोस्टवर पेट्रोल बॉम्ब फेकला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हल्ल्यानंतर काही तासामध्येच महिलेची ओळख पटली आणि त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला अटक केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com