Telegram CEO: टेलिग्रामचा सीईओ खरा 'विकी डोनर', 39 व्या वर्षी बनला 100 मुलांचा बाप

Telegram CEO: टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी शंभर बाळांचा बाप. हो, तुम्ही जे वाचलं ते बरोबर वाचलं. आपण शंभर मुलांचे बाप असल्याचा खुलासा स्वत: दुरोव यांनी केलाय.
Telegram CEO: टेलिग्रामचा सीईओ खरा 'विकी डोनर', 39 व्या वर्षी बनला 100 मुलांचा बाप
Telegram CEOHansIndia
Published On

आता एक आगळी वेगळी बातमी आहे. भारतात हम दो हमारे दो हम दो हमारा एक, अशा कुटुंब नियोजन अभियानाच्या घोषणा तुम्ही ऐकल्या असतील. मात्र टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी केवळ 39 व्या वर्षी थेट 100 मुलांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे 12 देशांमध्ये ही मुलं त्यांनी जन्माला घातलीय. 100 मुलांना जन्म देण्याची ही आगळी वेगळी कहाणी. पाहूयात..

सोशल मीडिया अॅप टेलिग्रामचे संस्थापक आणि CEO पावेल दुरोव यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. पावेल यांनी त्यांचे 12 देशांमध्ये 100 पेक्षा जास्त मुले असल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर जगभर मोठी खळबळ उडालीय. सोशल मीडियावर याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जातायत. याबाबत पावेल यांनी स्वतः मोठा खुलासा केलाय. पावेल हे गेल्या 15 वर्षांपासून मुल बाळ होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म डोनेट करतायत..आज 12 देशात पावेलची 100 मुलं आहेत... याची संपूर्ण कहाणी पावेल यांनी टेलिग्रामवरील मेसेजमध्ये लिहीली आहे. पावेल यांनी मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया.

15 वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला. तो आणि त्याची पत्नी वंध्यत्वामुळे आई-बाबा होऊ शकत नव्हते. त्याने मला स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. सुरुवातीला मी हसलो. मात्र नंतर या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मी त्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेलो. त्यावेळी डॉक्टरांनी दर्जेदार स्पर्म डोनेट करणाऱ्या पुरुषांची संख्या अत्यल्प असल्याचं सांगितलं. त्यानुसार स्पर्म डोनेट करुन आजवर अनेक जोडप्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता आल्याचे मला समाधान आहे.

बॉलिवूडमध्ये आयुषमान खुरानाचा विकी डोनर हा चित्रपट आला होता. स्पर्म डोनेशनवर हा चित्रपट आधारलेला होता. पावेल हे देखील खऱ्या आयुष्यातील विकी डोनर ठऱले आहेत. पावेल यांचा हा निर्णय नक्कीच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे अशीही चर्चा सध्या सोशल मिडीयावर रंगलीये.

Telegram CEO: टेलिग्रामचा सीईओ खरा 'विकी डोनर', 39 व्या वर्षी बनला 100 मुलांचा बाप
Elon Musk: ईव्हीएम होऊ शकतो हॅक, एलन मस्क यांनी व्यक्त केली शंका; X वरील पोस्टनंतर केंद्रीय मंत्री संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com