परिणीती चोप्रा-आयुष्मान खुराना बॉक्स ऑफिसवर आमने-सामने, 'कोड नेम: तिरंगा' आणि 'डॉक्टर जी' होणार एकाच दिवशी रिलीज!

परिणीती चोप्रा-आयुष्मान खुराना यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.
Code Name: Tiranga and Doctor G
Code Name: Tiranga and Doctor GSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रिभू दासगुप्ताचा आगामी चित्रपट 'कोड नेम: तिरंगा' (Code Name: Tiranga) १४ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) आणि प्रसिद्ध गायक हार्डी संधू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, १४ ऑक्टोबरला अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांचा बहुचर्चित 'डॉक्टर जी'(Doctor G) हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

Code Name: Tiranga and Doctor G
Jhalak Dikhla Jaa 10: अली असगर रातोरात शोमधून बाहेर, कारण जाणून चाहत्यांना बसला धक्का !

कोड नेम: तिरंगा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड करताना, परिणीतीने चित्रपटाचे नवीन पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली. नवीन पोस्टर रिलीज करताना परिणीतीने लिहिले, 'राष्ट्र, प्रेम, त्याग. या चित्रपटासाठी माझ्या आवडत्या पंजाबी मुंडेसोबत काम करण्यास उत्सुक आहे'.

Code Name: Tiranga and Doctor G
राजू श्रीवास्तव अद्यापही बेशुद्ध; डॉक्टरांनी सांगितले 'हे' कारण

हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट एका गुप्तहेराच्या जीवनावर आधारित आहे. जो आपल्या देशाचे रक्षण करण्याच्या मोहिमेवर असतो. या मिशनदरम्यान त्याला अनेक बलिदान द्यावे लागतात. या चित्रपटात, परिणीती चोप्रा एका RAW एजंटची भूमिका साकारत आहे. जी तिचे ध्येय पार पाडण्यासाठी अनेक देशांमध्ये लांबचा प्रवास करताना दिसते. याशिवाय शरद केळकर, रजित कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

परिणीती चोप्रासोबत रिभू दासगुप्ताचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी 'द गर्ल ऑन ट्रेन'मध्ये एकत्र काम केले आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत, 'कोड नेम: तिरंगा' रिलायन्स एंटरटेनमेंट, फिल्म हँगर आणि विवेक बी अग्रवाल यांनी निर्मित केला आहे.

दुसरीकडे, 'कोड नेम: तिरंगा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देईल, अनुभूती कश्यप दिग्दर्शित आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत यांच्या 'डॉक्टर जी' हा चित्रपट देखील १४ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आयुष्मान आणि रकुल व्यतिरिक्त, शेफाली शाह आणि शीबा चड्डा सारखे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

'डॉक्टर जी' हा अनुभूती कश्यप दिग्दर्शित पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार आणि कोणता चित्रपट फ्लॉप ठरणार हे पाहावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com