८ महिन्यांपूर्वी जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती; वर्दळीचा रस्त्यावर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या उडाल्या चिंधड्या, नेमकी कुठं घडली घटना?

Tel Aviv Car Explosion : इस्रायलच्या तेल अवीव शहरामध्ये कारमध्ये मोठा स्फोट झाला. कारमध्ये स्फोटकांच्या मदतीने स्फोट घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत.
Car Explosion
Car Explosionx
Published On

Car Explosion in Tel Aviv : इस्रायलमधील तेल अवीव शहरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा भीषण स्फोट एका कारमध्ये झाल्याचे म्हटले जात आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इस्रायलमधील सरकारी अधिकाऱ्याने ही घटना दहशतवाद्यांशी संबंधित आहे का याचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.

इस्रायलमधील स्थानिक वृत्तपत्रांनुसार, गुरुवार (२५ सप्टेंबर) इस्रायलच्या तेल अवीवमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला, त्यात अनेक लोक जखमी झाले. स्फोटाचे कारण समोर आलेले नाही. स्फोटामध्ये जिवीतहानी झाली आहे की नाही याबाबत तपास सुरु आहे. याआधीही तेल अवीवजवळ स्फोट घडवून आणण्यात आले होते.

Car Explosion
Fact Check : कोल्डड्रिंकमध्ये व्हायरस? काय आहे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य?

फेब्रुवारी २०२५ मध्ये तेल अवीवजवळ ३ रिकाम्या बसेसना स्फोटक उपकरणांनी लक्ष्य करुन स्फोट घडवून आणले होते. याला दहशतवादी हल्ला असे वर्गीकृत करण्यात आले होते. बस रिकाम्या असल्याने स्फोटांमध्ये कोणताही जीवितहानी झाली नव्हती. सर्वप्रथम दोन बसेसवर काही मिनिटांतच स्फोट झाले, तर तिसऱ्या बसवर सुमारे पंधरा मिनिटांनी स्फोट झाला. इस्रायली अधिकारीांनी हल्ल्यात वापरलेली अतिरिक्त स्फोटके इतर दोन बसेसवरही आढळली, जी वेळेवर निष्क्रिय करण्यात आली.

Car Explosion
Shocking : अजबच! तरुणाच्या पोटात २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का

फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले पाच बॉम्ब एकसारखे होते. ते टायमरने सुसज्ज असल्याचे स्पष्ट झाले होते. या हल्लानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लष्कराला वेस्ट बँकमध्ये छापे तीव्र करण्याचे आदेश दिले होते. बस स्फोटानंतर आता आठ महिन्यांनी तेल अवीव शहरात कार स्फोट झाला आहे.

Car Explosion
Maharashtra Politics : नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे तक्रार, अजित पवारांच्या नेत्याला अखेर अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com