Teesta Setalvad News: तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, 'तात्काळ आत्मसमर्पण' करण्याचे कोर्टाचे आदेश

Gujarat HC Rejects Teesta Setalvad's Bail Plea: नरेंद्र मोदींना बदनाम करण्याच्या आणि गुजरात दंगल प्रकरणात गोवण्याच्या उद्देशाने त्यांनी कट रचल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर आहे.
Teesta Setalvad
Teesta Setalvadsaam tv
Published On: 

Activist Teesta Setalvad's Bail Plea Rejects : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. हा जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती निरझर देसाई यांनी तीस्ता यांना 'तात्काळ आत्मसमर्पण' करण्यास सांगितले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 2002 च्या गुजरात दंगलीच्या प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर सेटलवाड यांच्याविरोधात पुरावे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरेंद्र मोदींना बदनाम करण्याच्या आणि या प्रकरणात त्यांना गोवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचा सेटलवाड यांच्यावर आरोप आहे. या प्रकणी एफआयआर नोंदवल्यानंतर गुजरात पोलिसांनी 25 जून 2022 रोजी तिस्ता सेटलवाड यांनाही अटक केली होती.

Teesta Setalvad
Maharashtra Politics: बुलढाणा बस अपघातानंतर भाजपचा 'आक्रोश मोर्चा' रद्द; आशिष शेलार यांनी दिली माहिती...

नरेंद्र मोदींना गोवण्याचा कट रचल्याचा आरोप

सन 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह 63 जणांना गोवण्याचा कट रचण्यासाठी आणि पुरावे तयार करण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकणात जामीन मिळण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात सेटलवाड यांनी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज हायकोर्टाने शनिवारी फेटाळला आहे.

अनेक महिने राहिल्या तुरुंगात

गुजरात पोलिसांनी अटक केल्यानंतर तिस्ता सेटलवाड यांना अनेक महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टाने तीस्ता सीलतवाड यांना सप्टेंबर 2022 मध्ये जामीन मंजूर केला होता. यानंतर त्या तुरुंगातून बाहेर आल्या होत्या. (Marathi Tajya Batmya)

Teesta Setalvad
Nitin Gadkari News: सत्ता आणि संपत्तीचा अहंकार नसावा; नितीन गडकरींचा रोख नेमका कुणाकडे?

चुकीचे पुरावे तयार केल्याप्रकरणी एफआयआर

दरम्यान निर्जर देसाई यांनी गुजरात हायकोर्टात तिस्ताच्या जामीन अर्जावर सुनावणी करत तिस्ताची मागणी फेटाळून लावली आहे. गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिल्यानंतर गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद डीसीबीने चुकीचे पुरावे तयार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला. तिस्ता यांच्याशिवाय निलंबित आयपीएस संजीव भट्ट आणि राज्याचे माजी डीजीपी आरबी श्रीकुमार हे दोघेही या प्रकरणात सहआरोपी आहेत. (Latest Political News)

निलंबित आयपीएस, माजी डीजीपींची घेतली मदत?

तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात दंगलीनंतर काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांच्यासोबत कट रचल्याचा आरोप आहे, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी खोट्या पुराव्यासह खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर तिस्ता यांनी यासाठी निलंबित आयपीएस आणि माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांची मदत घेतल्याचा देखील आरोप आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.