Nitin Gadkari News: 'सत्ता आणि संपत्तीत अहंकार नसावा. जेव्हा एक व्यक्ती मजबूत होतो, तर चार व्यक्ती एकत्र येतात. याचा अर्थ आम्ही मजबूत होत आहोत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका केली. (Latest Marathi News)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरातील जी एस रासयोनी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले, 'मी भविष्याची चिंता करत नाही. देवाने मला पात्रतेपेक्षा अधिक दिलं आहे. त्यामुळं मी कुणाची चिंता करत नाही. जे करायचे आहे,ते करतच आहे.
'मला मते द्यायची असेल तर द्या आणि नसेल तर नका देऊ, मी जसा आहे, तसा आहे. मी राजकारणात चिंता करत नाही. जे सत्य आहे, ते करतो. देशातील नामांकित लोकांनी माझ्या सर्वात जास्त शिव्या खाल्ल्या आहेत, असे गडकरी म्हणाले.
'मी रोड मंत्री आहे, मात्र काही तरुण कायदे आणि नियमांचं पालन करत नाही. त्यामुळे अपघात होतात आणि मोठ्या प्रमाणात तरुण मृत्युमुखी पडतात. नियमांचे पालन केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
'लोकांनी चांगल्या घोड्याला चव्यनप्राश खाऊ घातलं पाहिजे. घोड्याला खाण्यास चारा नाही. तर गाढव चव्यनप्राश खात आहे, अशी परिस्थिती आहे. मी कोणाला घोडा म्हणत नाही. गाढव म्हणत नाही. चांगले लोक निवडून येत नाही, यासाठी जनता जबाबदार आहे, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
बुलढाण्यातील भीषण अपघातातील मृतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली. गडकरी म्हणाले, ' बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.