Parliament monsoon Session
Parliament monsoon SessionSaam Tv

Monsoon Session 2023 : संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून, समान नागरी विधेयक मांडण्याची शक्यता

Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार आहे.
Published on

Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार आहे. केंद्रातील मोदी सरकार या पावसाळी अधिवेशनात समान नागरी विधेयक (UCC) मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Session) २० जुलैपासून सुरू होणार असून, ११ ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार आहे. संसदीय कामकाज कॅबिनेट समितीच्या (CCPA) बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील भाजप सरकार समान नागरी संहिता विधेयक सादर करण्याची शक्यता आहे.

Parliament monsoon Session
Madhya Pradesh High Court: सहमतीनं शरीरसंबंध ठेवण्याचे वय १६ वर्षे असावं : हायकोर्ट

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत कामकाज चालेल. २३ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होतील. संसदेच्या विधायक आणि अन्य कामकाजात योगदान देण्याचे आवाहन मी सर्व पक्षांना करतो, असं जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

समान नागरी विधेयक मांडणार?

पावसाळी अधिवेशनात समान नागरी विधेयक मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतेच समान नागरी कायद्याचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यानंतर यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेस सज्ज

पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींनी समान नागरी विधेयकावर वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस या अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षानेही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Parliament monsoon Session
Light Combat Aircraft Tejas: लढाऊ विमान 'तेजस'चे हवाई दलात सात वर्षे पूर्ण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com