Shocking : शिक्षकाचं लाजीरवाणं कृत्य; विद्यार्थ्यांना टॅबवर दाखवले अश्लील व्हिडिओ, एकट्यात प्रायव्हेट पार्टला स्पर्श

Uttar pradesh Shocking : शिक्षकाचं लाजीरवाणं कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना टॅबवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे उघडकीस आलं आहे.
Uttar pradesh news
Uttar pradesh Shocking Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने लाजीरवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत शिकवताना शिक्षकाने टॅबलेटवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच वर्गात एकटं बोलवून प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंझनपूरच्या कोतवाली हद्दीतील विकास खंड सरसावा येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे शिक्षक आमचं ऐकून न घेता मारहाण करत असल्याचा आरो विद्यार्थ्यांनी केला आहे. मुलांची सहन करण्याची शक्ती संपली, त्यानंतर त्यांच्या पालकांना प्रकार सांगितलं. पुढे पालकांनी शाळेत येऊन या प्रकाराला वाचा फोडली.

मुलांनी घरात प्रकार सांगितल्यानंतर पालकांची झोप उडाली. पालक रागाच्या भरात शाळेत पोहोचले. त्यांनी शाळेत येऊन थेट शिक्षकाची धुलाई केली. पालकांनी शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

Uttar pradesh news
IAS Transfer List : तुकाराम मुंढेंची २३ व्यांदा बदली; राज्यात ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

शाळेतील संपूर्ण प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. पोलिसांत मुलांचे जबाब नोंदवण्यात येत आहे. शाळेतील या प्रकरामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे.

Uttar pradesh news
Attack on Bjp Leader : भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

गरोदर बायकोची चाकूने गळा चिरून हत्या

उत्तर प्रदेशच्या नवऱ्याने गरोदर बायकोची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने ५ महिन्यांच्या गरोदर बायकोसोबत भयकंर प्रकार केला आहे. 'तुझ्यासाठी सोन्याचा हार आणलाय. डोळे बंद कर.', असं म्हणत नवऱ्याने बायकोची हत्या केली.

रविशंकर आणि सपना यांचं ८ महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. गरोदर सपना नवऱ्यासोबतच्या भांडणामुळे आणि सासरची मंडळीला त्रासून बहिणीच्या घरी राहायला गेली होती. सपनाचा नवरा तिथेही पोहोचला. बहिणीच्या घरीच रविशंकरने सपनाला संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com