Tamilnadu Train Fire: साखर झोपेत असताना धावत्या ट्रेनमध्ये अग्नितांडव; ८ जणांचा होरपळून मृत्यू, २० जखमी

Tamilnadu Fire News: आगीने रौद्र रुप धारण केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Tamilnadu Train Fire
Tamilnadu Train FireSaam TV

Tamilnadu News:

तामिळनाडू येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. मदुराई येथे धावत्या ट्रेनने अचानक पेट घेतला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुनालूर-मदुराई एक्सप्रेसमध्ये ही भीषण आग लागली आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलाय.

Tamilnadu Train Fire
Pimpri- Chinchwad Accident News: थरारक! ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; १० मिनिटं चाकाखालीच अडकला होता

अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही प्रवाशांनी गॅस सिलिंडरची ट्रेनमधून नेल्याचा आरोप अन्य प्रवाशी करतायत. ट्रेनमधून सिलिंडर आणल्यानेच आग लागल्याचे दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com