Pimpri- Chinchwad Accident News: थरारक! ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; १० मिनिटं चाकाखालीच अडकला होता

Pimpri- Chinchwad Hinjawadi Accident News: पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील विठ्ठल लॉनस समोर एक अत्यंत वेदनादायी अपघात झाला आहे
 Pimpri- Chinchwad Hinjawadi Accident News
Pimpri- Chinchwad Hinjawadi Accident NewsSaam tv
Published On

Pune Accident News:

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील विठ्ठल लॉन्ससमोर एक अत्यंत वेदनादायी अपघात झाला आहे. ट्रकच्या मागच्या टायर मध्ये जवळपास दहा मिनिटं अडकून एका व्यक्तीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.

 Pimpri- Chinchwad Hinjawadi Accident News
Shahaji Bapu Patil News : आधी काँग्रेस आता भाजप-शिवसेना! बापूंनी विकासाचा पाढा वाचून दाखवला

रामदास वडजे असं ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रामदास वडजे हा बुधवारी सकाळी साडेसात वाजता आपल्या दुचाकी वाहनावरून कामाला जयाला निघाला होता.

तितक्यात भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला धडक दिली, आणि तो त्या ट्रकच्या मागच्या चाकामध्ये चिरडून अडकला. रामदास वडजे ट्रक खाली चिरडल्यानंतर, ट्रक ड्रायव्हर रंगनाथ रामभाऊ तांबे याने त्याची सुटका करण्याऐवजी तिथून पळ काढला.

त्यामुळे जवळपास दहा मिनिटे रामदास वडजेला ट्रकच्या टायर खाली अडकून दुर्दैवी मरण यातना सहन कराव्या लागल्या. मात्र रामदास वडजे हा ट्रकच्या टायर खाली चिरडून मदतीसाठी याचना करत असताना त्याच्या मदतीला जवळपास दहा मिनिटं कुणीच धावून आला नाही. (Latest news in marathi)

 Pimpri- Chinchwad Hinjawadi Accident News
Doodle For Chandrayaan-3 : भारताचं चंद्रावर पाऊल, GOOGLE ने सुद्धा दखल घेतली, अनोखं डूडल वापरुन दिला मोठा सन्मान

तर या दरम्यान काही महाभागानी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये रामदास वडजेच्या दुर्देवी मरण यातना कैद केल्या. हा सर्व प्रकार एका बस चालकाच्या लक्षात आल्यानंतर, त्या बस चालकाने आपल्या मनाची संवेदनशीलता दाखवत काही जणांच्या मदतीने ट्रकला हातांनी ढकलून रामदास वडजजे ची सुटका केली.

मात्र तोवर खूप उशीर झाला होता. रामदास वडजेला एका खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

आता या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये रामदास भाऊ संजय वडजे च्या तक्रारीवरून ट्रक ड्रायव्हर रंगनाथ रामभाऊ तांबे ह्यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी भादवी 304, ( अ ) 338, 427 मोटर वाहन कायदा कलम 184,0119, 177 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com