Shocking : अशक्तपणा आला, अंगात विष पसरलं अन् जागीच मृत्यू झाला; २० वर्ष जुन्या बाटलीतून कॉफी पिणं पडलं महागात

Taiwan News : २० वर्ष जुन्या थर्मासमधून कॉफी पिल्याने विषबाधा होऊन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Taiwan News
Taiwan NewsSaam tv
Published On
Summary
  • २० वर्ष जुन्या थर्मासमुळे व्यक्तीचा मृत्यू

  • गरम कॉफीमुळे शिसे पेयामध्ये मिसळले

  • दीर्घकाळ विष साचल्याने गंभीर आजार

  • जुनी भांडी वापरण्याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे

सकाळी उठल्यावर तुमचा दिनक्रम कसा असतो? तुम्ही सकाळी उठल्यावर चहा पिता की कॉफी? ही प्रत्येकाची आवड असते. काही जण ग्रीन टी पितात, काही जण घरगुती पेये पसंत करतात आणि काही जण नियमित चहा किंवा कॉफी पितात. पण तुम्ही काय पिता हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकचं तुम्ही ते कोणत्या भांड्यातून पिता हे देखील महत्त्वाच आहे. कारण एका व्यक्तीने २० वर्ष जुन्या बॉटल मधून कोफी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना सध्या व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला. ही कार एका दुकानाला आदळली आणि अपघात झाला. प्रथमदर्शनी हा अपघात असला तरी डॉक्टरने केलेल्या खुलास्यात धक्कादायक बाब समोर आली. या व्यक्तीला सतत थकवा, मेंदूच्या एका भागात आकुंचन, अशक्तपणा आणि मूत्रपिंडाचे नुकसान अशा अनेक समस्या होत्या. सर्व लक्षणे डिमेंशियासारखीच होती. त्याला कोणत्याही पदार्थाची चव ओळखता येत नव्हती.

Taiwan News
Accident News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात, कारची डिव्हायडरला जोरात धडक, डॉक्टरसह तिघांचा मृत्यू

डॉक्टरांच्या अहवालानुसार, त्या व्यक्तीच्या रक्तात जास्त प्रमाणात शिसं आढळले. अधिक चौकशीनंतर समजले की, मृत व्यक्ती गेले अनेक दिवस २० वर्ष जुन्या थर्मास बॉटल मधून कॉफी पीत होता. या बॉटलची झीज होऊन कालांतराने त्या थर्मास मधील थर गंजला आणि तुटला. शिवाय कॉफीसारख्या गरम पेयांमुळे धातूचा थर खराब झाला आणि हळूहळू शिसे त्याच्या कॉफीमध्ये मिसळले. हे वर्षानुवर्षे चालू राहिले आणि हळूहळू विष त्याच्या शरीरात जमा झाले.

Taiwan News
Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

डॉक्टर जयंत ठाकुरिया म्हणाले की, शरीरात जास्त प्रमाणात शिसे जमा झाल्यावर शिशाचे विष तयार होऊ लागते. याचा परिणाम मेंदूसह अनेक अवयवांवर होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते. ते यकृत आणि मूत्रपिंडांवर देखील परिणाम करते, ज्यामुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी होते. शिश हाडांमध्ये जमा होते, ज्यामुळे हाडांची कमकुवतता येते. यामुळे अशक्तपणा आणि उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वस्तूचा अतिप्रमाणात वापर करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com