पश्चिम बंगालच्या निवडणुका शांततेत पार पडल्याचा दावा निवडणूक आयोग आणि भाजप निकालाच्या दिवशी केला. मात्र हा पुढच्या काही तासांतच मोडित निघाला. कारण निकालानंतर तीन दिवसात 4 जणांची हत्या झाली. आणि हे कमी होतं की काय भाजप नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
भाजप नेते सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या मध्यग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. बाईकवरुन आलेल्या तिघांनी गाडी अडवून 3 गोळ्या झाडल्या. हल्लेखोर नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून आल्याची माहिती असून चंद्रनाथ रथ यांनी गेल्या 5 वर्षांपासून सुवेंदू अधिकारींसोबत काम, निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच
सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या
पश्चिम बंगालच्या मध्यग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार
बाईकवरुन आलेल्या तिघांनी गाडी अडवून झाडल्या 3 गोळ्या
नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून हल्लेखोर आल्याची माहिती
5 वर्षांपासून सुवेंदू अधिकारींसोबत काम, निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
दरम्यान सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांचा हत्येआधीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय. एव्हंढच नाहीतर सत्ता स्थापनेनंतर लगेचच गुंडाराज संपवून टाकणार असल्याचा निर्धार सुवेंदू अधिकारी यांनी केलाय.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी कडक कारवाई करण्यात आलीये. आतापर्यंत 200 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून 400 हून अधिक लोकांना विविध प्रकरणांत अटक करण्यात आलीये. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये ११०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र या प्रकरणामुळे यंदाच्या निव़डणुकीतही बंगालची रक्तरंजित परंपरा कायम राहल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भाजपसमोर पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि गुंडाराज संपवण्याचं मुख्य आव्हान असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.