भारतातून फरार झालेला कुख्यात गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी पीनीपेग शहरात त्याची हत्या केली. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात तो पंजाब पोलिसांना हवा होता. (Crime News)
पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सुक्खा २०१७ मध्ये कनाडाला पळून गेला होता. तिथून तो खंडणीचं रॅकेट चालवत होता. दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांत एनआयएने मंगळवारी ४० हून अधिक कुख्यात गुंडांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात सुक्खाचाही समावेश होता.
सुक्खा हा बांबिहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचं वैर होतं, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पंजाबच्या मालियान गावात २०२२ मध्ये कबड्डी सामन्यांदरम्यान कबड्डीपटू संदीप नगल अंबिया याची हत्या झाली होती. या हत्येत सुक्खा हा आरोपी होता. अमृतसरमधील एका नातेवाईकाच्या घरात त्याने मारेकऱ्यांना आश्रय दिला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुक्खाला पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली मागील वर्षी जूनमध्ये पंजाब पोलीस दलातील दोघांवर एफआयआर दाखल झाला होता. पंजाब पोलिसांच्या एडीटीएफच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला होता.
सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून टोळीनं सुक्खाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमधून टोळीनं आणखी काही कुख्यात गुंडांना धमकी दिली आहे. कितीही पळा, तुमच्या पापाची शिक्षा मिळणारच, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.