Canda vs India: भारत अन् कॅनाडाचा वाद विकोपाला; कोण आहे हरदीप सिंग निज्जर?

Who is Hardeep Singh Nijjar: कॅनाडामध्ये हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली होती. हरदीपच्या हत्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलाय.
Hardeep Singh Nijjar
Hardeep Singh NijjarSaam Tv

Who is Hardeep Singh Nijjar:

या वर्षी जून महिन्यात हरदीपची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावरुन भारत आणि कॅनाडामध्ये वाद सुरू झालाय. कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारतानं कॅनाडा सरकारला सुनावलं. हरदीप हा खलिस्तान या फुटीरतावादी विचारसरणीचा समर्थक होता. पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करण्याची मागणीसाठी तो आग्रही होता. (Latest Politics News )

हरदीप सिंग निज्जरचा जन्म पंजाब राज्यातील जालंधरमध्ये असलेल्या हरसिंगपूर गावात झाला होता. त्यानंतर तो १९९५ मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाला होता. गेल्या काही वर्षांत तो बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो हिंसाचार, विंध्वसक कारवायामुळं चर्चेत आला होता. कॅनाडात स्थित असलेला निज्जरवर भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपा होता. त्यामुळे तो सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर होता.

भारताविरुद्ध कट रचण्यात आणि दहशतवादी कारवाया केल्याबद्दल NIA ने त्याच्याविरुद्ध आरोपपत्रदेखील दाखल केले होते. निज्जर हा २००७ मध्ये लुधियानामधील शिंगार सिनेमा बॉम्बस्फोट तसेच २००९ मध्ये पटियाला येथे राष्ट्रीय शीख संघाचे अध्यक्ष रुल्डा सिंग यांच्या हत्येसह अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये अडकला होता.

खलिस्तान संघटनेत सहभागी

खलिस्तान संघटनेत निज्जर सक्रीय होता. भारतातील पंजाब प्रांत वेगळा करण्यासाठी तो कारवाया करत होता. ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथे खलिस्तान रिफेरेड्रम आयोजित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच तो शिख फॉर जस्टीस या संघटनेत देखील काम करत होता. या संघटनेला भारतात बंदी आहे. हरदीपवर कॅनाडा सरकारनं कारवाई करावी, अशी मागणी भारताकडून केली जात होती.

हरदीप हा भारतामध्ये वॉन्टेड दहशतवादी होता. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेनं २०२२ मध्ये त्यांच्या नावावर १० लाख नावांचं बक्षीस ठेवलं होतं. जालंधर येथील हिंदू पुजाऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यात तो आरोप होता. खलिस्तान टायगर फोर्स(KTF)या संघटनेचा तो प्रमुख राहिला होता.

खलिस्तान टायगर फोर्स (KTF):

२०११ मध्ये पाकिस्तानस्थित खलिस्तान टायगर फोर्स (KTF) चे सुप्रीमो जगतार सिंग ताराशी निज्जरची ओळख झाली होती. त्यानंतर तो या संघटनेत सहभागी झाला. त्यानंतर निज्जर जगत सिंग ताराला आर्थिक फंड पुरवत असायचा. त्याने पाकिस्तानात जाऊन आयईडी बनवण्याचं आणि शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. निज्जर याने जगत सिंग ताराचं ठिकाणं बदलण्यास मदत केली होती. २०१४ मध्ये जगत सिंग ताराला पाकिस्तानमधून थायलँडमध्ये पाठवलं होतं.

तसेच कॅनाडामधील शिख तरुणांना शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना तो भारतात पाठवत आणि भारतातील प्रमुख पोलीस अधिकारी आणि धर्मगुरूंना टार्गेट करण्यास सांगत. फुटीरतावादी संघटनांमध्ये कार्यरत असतानाही निज्जरने पंजाबी गँगस्टर अर्शदीप सिंग गिल याच्याशी हात मिळवणी केली होती. अर्शदीप सिंगला अर्श दाला नावानं ओळखलं जातं. हे दोघे भारत आणि कॅनाडामधील दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवत.

कॅनाडामध्ये खलिस्तानी सक्रीय आहेत. भारतानं मे १९७४ मध्ये राजस्थानात पोखरण परमाणू परीक्षण केलं. यामुळे कॅनडा सरकार नाराज झाली होती. भारताला शांती प्रस्थापित करण्यासाठी परमाणू ऊर्जासाठी रिएक्‍टर्स दिले होते. परंतु भारतानं CANDUच्या रिएक्‍टर्सचा वापर पोखरण परमाणूसाठी केला. त्यावेळी पियरे ट्रूडो कॅनाडाचे पंतप्रधान होते आणि ते भारतावर नाराज झाले होते. त्यानंतर भारत आणि कॅनाडासोबतचे संबंध खराब होऊ लागले. त्याचवेळी भारतात खालिस‍तान आंदोलन वाढू लागलं होतं.

राजकीय शोषण होत असल्याचं सांगत अनेक शिख लोकांनी कॅनाडामध्ये आश्रय घेतलं होतं. यात एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब विस्फोट करणारा खालिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंह परमार देखील होता. दरम्यान इंदिरा गांधीच्या सरकारनं परमार यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु पियरे टुडो यांनी त्यास नकार दिला. त्यापासून भारत आणि कॅनाडाच्या संबंधात तेढ निर्माण झाली आहे.

कॅनाडानं जस्टीन ट्रूडो सरकारनं भारतासोबतच्या व्यापार कारण न सांगता बंद केला होता. त्यानंतर कॅनाडातील वाढता खलिस्तानी संघटनेवर ट्रूडो सरकार काही करत नसल्यानं भारतानं कठोर शब्दात तेथील सरकारलं सुनावलं होतं.

Hardeep Singh Nijjar
Delhi Narendra Modi News | अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com