NIA Releases List of 43 Criminals: देशातील गँगस्टर-दहशवाद्यांचं कॅनडा- खलिस्तानशी कनेक्शन; NIAने यादी जारी करत कारवाईसाठी आखला मोठा प्लान

NIA Releases List of 43 Criminals: देशात दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर कारवाई करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरुवात केली आहे.
NIA Releases List of 43 Criminals:
NIA Releases List of 43 Criminals: Saam tv
Published On

NIA Releases List of 43 Criminals:

देशात दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर कारवाई करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरुवात केली आहे. यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ४३ कुख्यात गँगस्टर-दहशवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच यंत्रणेने यादी जारी करत त्यांची मालमत्ता आणि व्यवसायाबद्दल काही ठाऊक असल्याची त्याची माहिती लोकांकडून मागितली आहे. हे दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर कुठेही आढळल्यास त्वरित माहिती देण्याचेही आवाहन एनआयएने लोकांना केले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने यांनी दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर कारवाई करण्यासाठी मोठा मास्टर प्लान आखल्याचे दिसून येत आहे.

यंत्रणेने आतापर्यंत अनेक गँगवॉर, खंडणी आणि इतर गुन्ह्यातून मिळवलेली मालमत्ता जप्त केली आहे. याचप्रमाणे ४३ गँगस्टर-दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मालमत्तेची माहिती शोधण्याच्या मागे यंत्रणा लागली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जारी केलेल्या गँगस्टरची नावे काय?

1) अर्शदीप डाला : अर्शदीप कॅनडा आणि खलिस्तान टायगर फोर्स, 'आयएसआय'सोबत पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे.

2) लखबीर सिंह लांडा : पंजाबमध्ये राहणारा हा दहशवादी सध्या कॅनडात राहत आहे. लखबीर हा 'आयएसआय'सोबत काम करत आहे.

3) गोल्डी बराड : गोल्डी बराड सध्या कॅनडामध्ये राहत आहे. त्याचा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा सहभाग होता.

4) लॉरेंस बिश्नोई : लॉरेंस बिश्नोईने गुन्हे जगतात मोठं जाळं निर्माण केलं आहे. कॅनडा आणि पाकिस्तानात बसून दहशतवादी कारवाया करत आहे. सध्या बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आहे.

5 ) जसदीप सिंह (जग्गू भगवानपुरिया) , 6. अनमोल बिश्नोई 7. काला जठेड़ी 8. विरेंद्र प्रताप ( काला राणा) 9. जोगिंदर सिंह 10. राजेश कुमार ( राजू मोटा) 11. राज कुमार ( राजू बसूडी) 12. अनिल चिप्पी 13. मोहम्मद सहबाज अंसारी 14. दलीप कुमार ( भोला) 15. विक्रांत सिंह ( विक्रम बराड) 16. सचिन थापन बिश्नोई , 17. दरमन सिंह (दरमनजोत कहलोन) 18. सुरेंद्र सिंह 19.युद्धवीर सिंह 20. विकास सिंह 21. प्रवीण वाधवा (प्रिंस), 22. गौरव पटयल (सौरव ठाकुर) 23. सुखप्रीत सिंह 24. अमित डागर 25. आसिफ खान 26. कौशल चौधरी 27. नवीन डबास 28. छोटू राम 28. भूपेंद्र सिंह ( भूपी राणा)

29. संदीप 30. सुखदोल सिंह 31. गुरपिंदर सिंह 32. नीरज ( पंडित) 33. जगशीर सिंह ( जग्गी) 34. सुनील बालियान 35. दलेर सिंह, 36. दिनेश शर्मा, 37 मनप्रीत सिंह पीटा, 38. हरीओम ( टीटू) , 39. हरप्रीत, 40, सखबीर सिंह, 41. इरफान ( चीनू पहलवान), 42. सन्नी डागर 43. टिल्लू ताजपुरिया

दरम्यान, एनआयएने एक संपर्क क्रमांक जारी केला आहे. या गँगस्टरची माहिती आढळल्यास 7290009373 या क्रमांकावर माहिती द्या, अशी माहिती एनआयएने सांगितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com