Rajsthan Political crisis : राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सोनिया गांधी नाराज; काँग्रेस गेहलोतांवर काय निर्णय घेणार?

राजस्थानमधील राजकीय नाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज असून नाट्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
sonia gandhi
sonia gandhi saam tv

शिवाजी काळे

Rajsthan Political crisis : राजस्थानमधील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे. त्याआधीच त्यांना राजस्थानचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, त्याच्यानंतर राजस्थानचा 'पायलट' कोण असणार ? यावर सध्या एकमत होताना दिसत नाही.

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर सचिन पायलट यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, अशोक गेहलोत गटाचा पायलट यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय नाट्य पाहायाला मिळत आहे. या राजकीय नाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज असून नाट्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

sonia gandhi
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता, जाणून घ्या

राजस्थानमधील नाराजीनाट्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज झाल्या आहेत. राजस्थानमध्ये नाट्य करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे निकटवर्तीय शांती धारीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

शांती धारीवाल यांनी पक्षाने बोलावलेल्या बैठकीच्या व्यतिरिक्त बैठक बोलावली होती. तसेच या बैठकीतील आमदारांच्या जेवणाची सोय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानमधील आमदारांच्या बंडामागे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असल्याची देखील चर्चा आहे.

sonia gandhi
Ashok Gehlot : अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर?; 'ही' नावे आता चर्चेत

राजस्थानचे प्रभारी अजय माकन उद्या मंगळवारी राजस्थानच्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिखित स्वरुपात रिपोर्ट सादर करणार आहे. आज, सोमवारी अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची १० जनपथवर भेट घेतली. त्यामुळे राजस्थानचा मुख्यमंत्री बदलला जाणार का ? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com