फोन वापरून दिला नाही, हॉस्पिटलला छावणीचं स्वरूप...; नवीन व्हिडिओतून सोनम वांगचुकांचे धक्कादायक खुलासे

Sonam Wangchuk hospital allegations video details: उपोषण संपल्यानंतर सोनम वांगचुक यांनी मोठे आरोप करत हॉस्पिटलमध्ये तुरुंगासारखी वागणूक मिळाल्याचा दावा केला आहे. फोन वापरू दिला नाही, भेटण्यास मनाई केली, असा गंभीर आरोप त्यांच्या व्हिडिओत करण्यात आला आहे.
Sonam Wangchuk speaking in a viral video, alleging strict restrictions and “prison-like” conditions during his hospital stay after hunger strike.
Sonam Wangchuk speaking in a viral video, alleging strict restrictions and “prison-like” conditions during his hospital stay after hunger strike.saam tv
Published On

उपोषण सुटल्यानंतर होत असलेल्या टीकेला सोनम वांगचुक यांनी उत्तर दिलं आहे. मला डील करायची असती, तर मी २६ दिवस उपाशी राहिलो नसतो, असा संताप सोनम वांगचुक यांनी व्यक्त केला. सफदरजंग रुग्णालय हे तुरुंगासारखे होते असा आरोपही त्यांनी केला. सोनम वांगचुक यांनी आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत मोठे गौप्यस्फोट केले आहे. 22 दिवस उपोषण करून मला बाहेर पडावे लागले. यावेळी त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत बोलताना संताप व्यक्त केला आहे. मला अटक करा असे ते म्हणत आहे.

Sonam Wangchuk speaking in a viral video, alleging strict restrictions and “prison-like” conditions during his hospital stay after hunger strike.
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना भाजपकडून मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचुक

मला कोणाला भेटू दिले जात नव्हतं. मेदांता हॉस्पिटललाही छावणी बनवण्यात आलं आहे. रुग्णालयात माझ्यावर अनेक बंधनं लावली गेली. कोर्टाच्या आदेशानंतरही मला सफरदरजंगमधून हलवले नाही. गेल्या 1-2 आठवडयात माझ्या परिवाराने खूप काही सोसलं आहे. सफरदरजंग रुग्णालय तुरुंगासारखे होते. हॉस्पिटलमध्ये मला कुणालाही भेटू दिलं जात नव्हतं. तसेच मला रुग्णालयात फोनही वापरू दिला जात नव्हता. पोलिसांनी आमचा फोन हिसकावून घेतला. जे.पी नड्डा आले आणि मला उपोषण सोडण्यास विनंती केली. मी त्यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sonam Wangchuk speaking in a viral video, alleging strict restrictions and “prison-like” conditions during his hospital stay after hunger strike.
कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई देण्याची मागणी केली असे सोनम वांगचुक यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यामध्ये त्यांनी सरकारवर अनेक खळबळजनक आरोप करत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत जी काय वागणूक झाली त्याची त्यांनी धक्कादायक माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com