
आरजेडीच्या राजदनगरमधील नेत्याच्या मुलाची हत्या
संजीव सिंह यांचा मृतदेह झाडाझुडपात सापडला
संजीव सिंह यांचा मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी राजनगरच्या अध्यक्ष राजू सिंह यांचा मुलगा संजीव सिंह (३५) यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. संजीव सिंह यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजीव शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर गेले. परंतु रात्रीपर्यंत घरी परतले नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोबाईलवरून संजीव यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजीव यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर रविवारी सरैया पुलाजवळील झाडाझुडपात संजीव यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाशेजारीच त्यांची बाईक देखील होती.
संजीव सिंह यांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले. संजीव यांच्या हत्येनंतर समर्थकांनी महामार्ग रोखला. समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर परिसरात वातावरण तापलं. या आंदोलकांनी आरोपींना लवकराच लवकर अटक करून कारवाईची मागणी केली.
संजीव सिंह यांच्या हत्येची माहिती मिळताच डीएसपी संजय पांडेय हे पोलीस पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संतापलेल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाला वेगाने सुरुवात करण्यात आळी आहे. एफएसएलची टीम घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'संजीव सिंह यांचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. मोबाईल शोधण्याचे काम सुरु आहे'.
संजीव सिंह यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांकडून संजीव सिंह यांच्या मृत्यूचं कारण शोधण्याचं काम सुरु आहे. 'संजीव यांची हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने शोध घेत आहे. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर लोकांनी रस्त्यावरील आंदोलन थांबवलं. त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली.
घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजीव सिंह यांच्या हत्येने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर संजीव सिंह यांच्या नातेवाईकांनी आरोपींना लवकर पडकण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.