Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

Horrific incident in delhi : दिल्लीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीये. घरगुती वादातून जावयाने जावयाने मायलेकीची हत्या केली.
Delhi Crime news update
Delhi Crime newsSaam Tv
Published On
Summary

दिल्लीतील रोहिणी सेक्टरमध्ये जावयाकडून पत्नी आणि सासूचा खून

कैचीने केलेल्या हल्ल्यात दोघींचा जागीच मृत्यू

आरोपी योगेश सहगल फरार

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास गतीने सुरू

दिल्लीच्या रोहिणी सेक्टरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. दिल्लीत घरगुती वादातून मायलेकीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडाने दिल्लीत खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

जावयाने घरगुती वादातून पत्नी प्रिया (२७ वय) आणि सासू कुसुम सिन्हा (६३ वय) या दोघांची हत्या केली. योगेश सहगल असे आरोपीचे नाव आहे. दोघांची हत्या करून जावई फरार झाला. दोघांच्या हत्येने दिल्लीकरांमध्ये भीती निर्माण झालीये.

Delhi Crime news update
Maratha Reservation : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सामील मराठा तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. कुटुंबात शनिवारी वाद वाढला. संतापाच्या भरात जावयाने कैचीने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मायलेकीचा मृत्यू झाला. दोघांच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळावरून पुराव्यांचा शोध घेत आहे.

Delhi Crime news update
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या लढ्यात अजित पवारांचा आमदार उतरला; सरकारला दिला घरचा आहेर, मोजक्या शब्दात केली पोलखोल

पोलिसांनी फरार आरोपीचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचाही तपास केला जात आहे. दुहेरी हत्याकांडाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करू, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मायलेकीच्या हत्येने दिल्लीत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांनी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com