Snake Bite MP News: एका सापाने संपवलं कुटुंब; मायलेकीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Snake Bite : एका घरामध्ये जमिनीवर झोपलेल्या एका कुटुंबातील सदस्यांना सापानं दंश केल्याने माय लेकीचा मृत्यू झालाय.
Snake Bite MP News
Snake Bite MP Newssaam Tv
Published On: 

Snake Bite :

मध्य प्रदेशातील भिंड येथे एका घरामध्ये जमिनीवर झोपलेल्या एका कुटुंबातील सदस्यांना सापानं दंश केल्याने माय लेकीचा मृत्यू झालाय. तर मुलाची स्थिती गंभीर आहे. ही घटना भिंडमधील फुप पोलीस स्टेशन हद्दीतील राणी बिरगवान गावातील आहे. सर्पदंश केल्यानंतर थेट रुग्णालयात न नेता मांत्रिकाकडे नेल्यानं एकाच घरातील दोन जणांचा मृत्यू झाला. (Latest National News)

बिरगवान या गावात राहणारे मुकेश बरेठा हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते. मुकेश यांची पत्नी राधा, त्यांची मुलगी यिशू आणि मुलगा कृष्णा हे जमिनीवर झोपले होते. मध्यरात्री अचानक मुलं रडायला लागली. रडण्याचा आवाज ऐकून संपूर्ण कुटुंब जागं झालं, तेव्हा त्यांच्या जवळून साप जात असल्याचं दिसलं हे पाहून त्यांच्या पायाखालची जमिनी सरकली.

आई राधा (वय ३४), यिशू (वय १२ ) आणि कृष्णाच्या (वय १२ वर्ष) पायावर साप चावल्याच्या खुणा पाहून सगळे चिंतेत पडले. तेव्हा राधा आणि तिच्या दोन मुलांना सापाच्या विषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम खरीका मोतीपुरा गावात नेलं. येथे मांत्रिकाच्या साहाय्याने सापाचं विष काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

यानंतर तिघांनाही रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भिंड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. येथे डॉक्टरांनी राधा आणि तिची मुलगी यिशू यांना तपासून मृत घोषित केलं. तर कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर मुलगा कृष्णाला भिंड येथून ग्वाल्हेरला उपचारासाठी नेण्यात आले आहे.

राधाचा दीर अंकेश यांनी सांगितलं की, सर्वजण जमिनीवर झोपले होते आणि तेव्हा सापाने त्यांना दंश केलं. तर भिंड येथील जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर सतीश शर्मा यांनी सांगितलं की, त्यांच्या शरीरामध्ये सर्पदंशाची लक्षणं दिसत आहेत. विशेष म्हणजे राधा आणि तिच्या मुलीला थेट रुग्णालयात आणण्याऐवजी कुटुंबीयांनी मांत्रिकाकडे जाण्यातच आपला वेळ वाया घालवला. यामुळेच वेळेवर उपचार न मिळाल्याने राधा आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला.

Snake Bite MP News
Wardha Crime: रेल्वे स्टेशनवर महिनाभर पाहिली प्रेयसीची वाट; नंतर घरात जाऊन प्रियकरानं केला घात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.