

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय
एसआयआरसाठीच्या अंतिम मुदतीत वाढ
उत्तर प्रदेश, गुजरातसह सहा राज्यांसाठी निर्णय
उत्तर प्रदेश, गुजरातसह सहा राज्यांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठीची (SIR) अंतिम मुदत वाढवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशसह सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात एसआयआर २०२६ अंतर्गत दावे आणि हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. विविध राज्यांत प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि तांत्रिक-प्रशासकीय कारणांचा विचार करून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
तमिळनाडू आणि गुजरातमध्ये एसआयआर अर्ज जमा करण्याची मुदत १४ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. आता आयोगाने त्यात वाढ केली आहे. या दोन्ही राज्यांत १९ डिसेंबरपर्यंत एआयआर अर्ज जमा करता येणार आहेत. त्यामुळे या राज्यांतील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे तयार करणे तसेच जमा करण्यासाठी पाच दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान व निकोबारमध्ये अंतिम मुदत १८ डिसेंबर २०२५ वरून वाढवून २३ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात एसआयआरची अंतिम मुदत २६ डिसेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
एसआयआरसाठी मुदत वाढवण्यात आली असून, या सहा राज्यांतील नागरिकांनी एसआयआर संबंधित कामे पूर्ण करावीत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. एसआयआर प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी, तसेच अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणखी २ आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्याबाबत विनंती केली होती, असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा म्हणाले होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सुधारित वेळापत्रकानुसार, २६ डिसेंबर २०२५ पर्यंत गणना कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दावे आणि हरकती नोंदवण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ वरून ३० जानेवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ ते २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दावे आणि हरकतींचे निराकारण करण्यात येईल. उत्तर प्रदेशातील अंतिम मतदारयादी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.