
सध्या बॉलिवूडचं क्युट कपल कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लगीनगाठ बांधली. त्यांच्या या खास क्षणाला अविस्मरणीय करण्यासाठी सूर्यगड पॅलेसला खास सजावट करण्यात आली होती.
राजस्थानमधील पॅलेस, किल्ले नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी देखील ही उत्तम जागा आहे. सूर्यगड पॅलेसची देखील देशभर चर्चा सुरु आहे. हे हॉटेल अनेक शाही विवाहसोहळ्यांचे आणि पार्टीचे साक्षीदार राहिले आहे. या हॉटेलमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे.
सूर्यगड पलेसच्या आजूबाजूचा 10 किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे लाखोंमध्ये आहे. सूर्यगड पॅलेसच्या आत दोन हवेल्या बांधल्या आहेत. या हॉटेलच्या आतील भागात राजस्थानचे रंग दिसतात.
सुंदर कोरीवकाम आणि पाहुण्यांसाठी शाही व्यवस्था असलेली खुली बाग त्याची भव्यता वाढवते. या राजवाड्यात 92 बेडरूम आहेत. याशिवाय पाच मोठे व्हिला, दोन रेस्टॉरंट, इनडोअर स्वीमिंग पूल, जिम, बार, कृत्रिम तलाव, घोडेस्वारी आणि इनडोअर गेमच्या सुविधा आहेत.
या हॉटेलच्या खोल्या तीन वेगवेगळ्या श्रेणींध्ये विभागल्या गेल्या आहेत, ज्यांचे एका दिवसाचे भाडे 20,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे. बेस श्रेणीतील खोल्यांचे भाडे 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत आहे. तर, सुट श्रेणीतील खोल्यांचे भाडे 18,000 ते 50,000 रुपयांपर्यंत आहे.
जैसलमेर हवेलीमध्ये 2 बेड रूम आहेत. त्यात स्वतंत्र पूल आणि बाग आहे. त्याचे भाडे 80 हजार ते 1 लाखांपर्यंत आहे. तर थार हवेलीमध्ये 3 बेडरूम, दोन बागा आणि एक तलाव आहे. त्याचे भाडे दीड ते दोन लाख रुपये आहे.
याशिवाय हॉटेलमध्ये दोन प्रकारच्या हवेल्या देखील आहेत ज्यात जैसलमेर हवेली आणि थार हवेली यांचा समावेश आहे. यामध्ये जैसलमेर हवेलीमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचवेळी, थार हवेलीतील एका दिवसाच्या मुक्कामाचे भाडे दोन लाख रुपयांपर्यंत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.