

Shraddha Walkar Murder Case: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपीने हत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमांचा खुलासा केला आहे. तसेच श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली हे देखील आफताबने पोलिसांना सांगितले आहे.
श्रद्धा हत्याकांडात नव्यानं मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आरोपी आफताबवर श्रद्धाची हाडे ग्राइंडरमध्ये बारीक करून हाडांच्या पावडरची विल्हेवाट लावल्याचा आरोप केला आहे. आरोपपत्रातील आफताबचा कबुलीजबाब पाहता त्याने हत्येनंतर तीन ते चार महिन्यांनी श्रद्धाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे आणि त्यानंतर धडाची विल्हेवाट लावली.
न्यायालयाने मंगळवारी आरोपी आफताब अमीन पूनावालाविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. कोर्टाने आरोपपत्राची प्रत आफताबच्या वकिलालाही दिली आहे. (Latest News Update)
आफताबने आपल्या कबुलीजबाबात केलाला नवा खुलासा समोर आला आहे. त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, 18 मे 2022 रोजी दोघांमध्ये घराच्या खर्चावरून वाद झाला होता. या भांडणात श्रद्धाने त्याला शिवीगाळ केली, त्यामुळे तो चिडला आणि त्याने तिची हत्या करण्याचा कट रचला. श्रद्धाला आधी जमिनीवर पाडले आणि तिच्यावर बसून तिचा गळा आवळून खून केला अशी धक्कादायक माहिती आफताबने कबुली जबाबात दिली आहे.
मृतदेहाचे तुकडे करण्याची विकत घेतले साहित्य
श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्याची योजना आरोपीने आखली. मृतदेह कापण्यासाठी त्याने 19 मे रोजी हार्डवेअरच्या दुकानातून हातोडा, करवत आणि तीन ब्लेड विकत घेतल्या. यानंतर दुसऱ्या एका दुकानातून कचऱ्याची पिशवी, चाकू आणि चॉपर खरेदी केले.
स्वत:ही झाला होता जखमी
आफताबने हत्त्येसाठी विकत घेतलेल्या वस्तू पिशवीत ठेवून तो घरी जात असताना पिशवीत ठेवलेल्या चाकूने त्याचा उजवा हात कापला गेला. यानंतर त्याने घराजवळील डॉक्टरांकडून पाच टाके लावून घेतले होते. आफताबने घरी आल्यावर त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने 25 हजार रुपयांना फ्रीज विकत घेतला होता. मृतदेहाचे तुकडे केल्यानतंर त्याने काही कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये भरले आणि काही फ्रीजमध्ये ठेवले.
वेगवेगळ्या ठिकाणी फेकले मृतदेहाचे तुकडे
आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या शरीराचे अवयव छत्तरपूर टेकडीच्या स्मशानभूमीजवळच्या जंगलात, उत्तरपूर एन्क्लेव्हच्या मागे असलेले जंगल, गुरुग्रामकडे जाणारा एमजी रोड आणि छत्तरपूर टेकडीजवळच्या जंगलात फेकल्याचा खुलासा केला आहे. त्याने हे काही तुकडे पेट्रोल टाकून जाळल्याचेही पोलीस चौकशीत सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.