तेलंगणातील नल्लागोंडा येथे एका घरातून चार जणांचे मृतदेह आढळले
मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून अन्य दोघांची ओळख अद्याप स्पष्ट नाही
प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणातून आत्महत्येचा संशय
घटना 3 ते 4 दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता
Telangana 4 Family Members Sucide Update तेलंगणातील नल्लागोंडा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलनी परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणातून ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृतांपैकी दोघांची ओळख सुलतान आणि हसीना अशी पटली आहे. सुलतान हे नल्लागोंडा शहरातील प्रकाशम बाजार परिसरात बॅगचे दुकान चालवत होते. तर त्यांची पत्नी हसीना या एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. घरात आढळलेल्या अन्य दोन मृतदेहांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. हे मृतदेह त्यांच्या मुलांचे आहेत की इतर नातेवाईकांचे, याचा तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित घराचा दरवाजा उघडलेला नव्हता. तसेच घरातील कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. अखेर दुर्गंधी वाढल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तोडून घरात प्रवेश केला. घराच्या आत चार जणांचे मृतदेह पडलेले होते. मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब होती. ते पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्यावर किडे पडलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतदेहांच्या स्थितीवरून ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. या सामूहिक मृत्यूमागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणते कारण यामागे असू शकते का, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.