धक्कादायक! बिहारच्या मतदान यादीत पाकिस्तानी महिलेचे नाव, गृह मंत्रालयाच्या तपासानंतर खळबळ

How Pakistani women were found in Bihar voter list before elections : बिहारमधील भागलपूरमधील मतदार यादीत दोन पाकिस्तानी महिलांची नावे समाविष्ट झाल्याचे उघड झाले. इमराना खानम उर्फ इमराना खातून आणि फिरदौसिया खानम या दोन पाकिस्तानी महिला आहेत, ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र देखील आढळले.
Voter ID
Voter IDSaam Tv
Published On
Summary
  • बिहार निवडणुकीआधी भागलपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.

  • दोन पाकिस्तानी महिलांची नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याचे उघड.

  • महिलांकडे मतदान ओळखपत्रदेखील असल्याचे तपासात समोर आले.

  • गृह मंत्रालयाने तपास सुरू केला असून जिल्हा प्रशासनाला कारवाईचे आदेश.

  • मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण.

Pakistani women’s names found in voter list : बिहार विधानसभा निवडणुकीआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या दोन महिलांची नावे मतदार यादीत असल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात उघड झाले आहे. भागलपूरमधील मतदार यादीत दोन पाकिस्तानी महिलांची नावे आढळल्यानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्या दोन महिलांकडे मतदान ओळखपत्र असल्याचेही समोर आले आहे. भागलपूरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आयोग आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. (How Pakistani women were found in Bihar voter list before elections)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांची तपासणी गृह मंत्रालयाकडून करण्यात येतेय. भागलपूरमध्ये तीन पाकिस्तानी राहात असल्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असताना इमराना खानम उर्फ इमराना खातून आणि फिरदौसिया खानम यांच्याकडे मतदान ओळखतपत्र असल्याचेही समोर आले. या दोन्ही महिला भागलपूरमधील इशाकचकमध्ये भिखनपूर गुमटी नंबर 3, टँक लेन येथे राहत होत्या. या दोन्ही पाकिस्तानी महिलांनी भारताची नागरिकता कधीही घेतली नाही. तरीही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. आतापर्यंत त्यांची नावे यादीतून काढली गेली नाहीत. याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

Voter ID
Illegal betting case: काँग्रेस आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या, १२ कोटींची कॅश अन् ६ कोटींचं सोनं जप्त

स्पेशल ब्रँचच्या या धक्कादायक रिपोर्टनंतर डीएम आणि एसएसपीकडे याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भागलपूरचे डीएम डॉक्टर नवल किशोर चौधरी यांनी दोन्ही महिलांची नावे मतदान यादीतून काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. कुणाच्या निष्काळजीपणामुळे ही गंभीर चूक झाली, याचा तपासही करण्यात येत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Voter ID
BJP Mumbai President : BMC निवडणुकीआधी भाजपची मोठी घोषणा, मुंबईचा अध्यक्ष निवडला, कुणाला मिळाली संधी?

फिरदौसिया खानम यांच्या मुलाने या प्रकरणात आणखीनच धक्कादायक दावा केला आहे. मोहम्मद गुलौज याने सांगितले की, त्यांच्या आईचा जन्म 1945 मध्ये झाला होता आणि त्या येथेच राहत आहेत. सर्व कागदपत्रे सादर करूनही अहवालात चुकीची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

Voter ID
Maharashtra politics : शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद? मुख्यमंत्र्यांचे नगरविकास खात्याच्या कारभारावर ताशेरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com