Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO

Cobra Bites Constable Video: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये भयंकर घटना घडली. कोब्राला रेस्क्यू करत असताना त्याने कॉन्सेबलला दंश केला. या कॉन्स्टेबलने कोब्र्यासोबत स्टंट देखील करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरारक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO
Cobra Bites Constable VideoSaam Tv
Published On

Summary -

  • इंदूरमध्ये कोब्राने दंश केल्यामुळे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

  • रेस्क्यूदरम्यान कोब्रा तोंडात धरून स्टंट करताना ही घटना घडली.

  • हाताला कोब्राने दंश केल्यानंतरही कॉन्स्टेबलने फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

  • कॉन्स्टेबलचा कोब्रा रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये भयंकर घटना घडली. कोब्राने दंश केल्यामुळे एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. कोब्राला रेस्क्यू करताना ही घटना घडली. कोब्राने हाताला दंश केला. त्यानंतर कॉन्सेबलने त्याला तोंडात धरून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कॉन्स्टेबलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोब्राला रेस्क्यू करत स्टंटबाजी करत असतानाचा कॉन्स्टेबलचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदूरच्या फर्स्ट बटालियनमध्ये कॉन्स्टेबलमधून काम करणाऱ्या संतोष चौधरी (४७ वर्षे) यांना रविवारी रात्री सूचना मिळाली की घोड्यांच्या गोठ्यामध्ये कोब्रा आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कोब्राला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. कोब्राला रेस्क्यू करत असताना त्यांना कोब्राने दंश केला. त्यांना तात्काळ एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण विष संपू्र्ण शरीरामध्ये पसरले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO
Shocking : ३ वर्षांपासून प्रेमसंबंध! तरुणानं काकीशी थेट पोलीस ठाण्यात केलं लग्न, दोघांचा 'तो' Video Viral

घडलं असं की, कोब्राला रेस्क्यू करत असताना संतोष चौधरी यांच्या हाताला कोब्राने दंश केला. हाताला कोब्राने चावा घेतल्यानंतर संतोष यांनी त्या कोब्राचे तोंड आपल्या तोंडात पकडण्याचा प्रयत्न केला. कोब्राने दंश केल्यानंतरही त्यांनी त्याला तोंडात धरून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले.

Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO
Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...

इंदूर येथे राहणारे संतोष चौधरी हे गेल्या १७ वर्षांपासून इंदूरच्या फर्स्ट बटालियनमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक सापांचे रेस्क्यू केले आहे. या अनुभवामुळे त्यांना एका ठिकाणी कोब्रा दिसल्यानंतर रेस्क्यू करण्यासाठी बोलावले. पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात खळबळ उडाली.

Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO
Shocking: संतापजनक घटना! हुंड्यासाठी सुनेवर अत्याचार; खोलीत बंद करून साप सोडला अन् किंकाळ्या ऐकून हसत बसले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com