Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

Shocking Incident : एक तरुणी तिच्या भावाच्या बायकोच्या प्रेमात पडली. दोघींमध्ये जवळीक वाढू लागली. काही दिवसांनी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लव्हस्टोरीची मोठी चर्चा होत आहे.
Shocking
Shockingx
Published On
Summary
  • नणंद आणि वहिनीमध्ये प्रेमप्रकरण उघडकीस आले; दोघी घरातून पळून गेल्या.

  • पतीने पत्नीचा फोन तपासला आणि रोमँटिक चॅट्स पाहून धक्का बसला.

  • बेपत्ता महिलेचा शोध सुरू असून पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

आपण अनेकदा टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये वहिनी आणि नणंद यांच्यामध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळते. पण वहिनी आणि नणंद यांच्यात प्रेमसंबंध केल्याचे तुम्ही ऐकलंय का? अशी अजबगजब घटना जबलपूरमध्ये घडली आहे. तेथे एक तरुणी तिच्या वहिनीच्या प्रेमात पडली. पुढे दोघी घरातून पळून गेल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरपाटण परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. आशुतोष नावाच्या एका तरुणाने सात वर्षांपूर्वी संध्या नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालले होते. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आशुतोष, त्याची पत्नी संध्या आणि ५ वर्षांचा मुलगा जबलपूरला स्थानिक झाले.

Shocking
Crime : भिंतीवर डोकं आपटून २ वर्षांच्या मुलाला संपवलं, नंतर नराधम बापानं स्वत:वर चालवली कुऱ्हाड

आशुतोषची चुलत बहीण मानसी ही जबलपूरमधील त्यांच्या घरी वारंवार येत असे. दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या. दोघी तासन्तास गप्पा मारायच्या, अनेकदा एकत्र बाजारात जायच्या. संध्या आणि मानसी दोघींमध्ये नणंद भावजय यांचे सुंदर नातं असल्याचे सर्वांना वाटत होते. पण त्यांच्यामध्ये अफेयर असल्याचे कोणालाही ठाऊक नव्हते.

Shocking
Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

१२ ऑगस्ट रोजी आशुतोषची पत्नी संध्या अचानक घरातून गायब झाली. दुसऱ्या दिवशी ती जबलपूर रेल्वे स्थानकावर सापडली. त्यानंतर संध्या तिचा पती आशुतोष आणि मुलासोबत काही दिवस त्यांच्या घरी राहिली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी मोबाईल फोन घरीच सोडून ती पुन्हा घरातून गायब झाली. परत न आल्याने आशुतोषने संध्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकामध्ये केली.

Shocking
Dombivli : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, ११ व्या मजल्यावरुन मारली उडी

आशुतोषला त्याच्या पत्नीची, संध्याची काळजी वाटत होती. पत्नी आणि बहीण यांच्यामध्ये प्रेमसंंबंध असल्याची त्याला माहिती नव्हती. संध्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने संध्याचा फोन तपासला. आशुतोषने संध्या आणि मानसी यांच्यातील चॅट्स वाचल्या. दोघांच्या रोमँटिक चॅट्स पाहून आशुतोषला मोठा धक्का बसला.

Shocking
Shocking : मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून संतापली, लोखंडी चमच्याने चिमुकल्याला दिले चटके; आईला अटक

एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या महिलेच्या पतीने जबलपूर ग्रामीणमधील घामपौर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पत्नीने तिचा फोन सोबत नेला नसल्याने तिचे ठिकाण शोधणे कठीण आहे. पण पोलिसांना काही तांत्रिक पुरावे सापडले आहेत, ज्याच्या आधारे बेपत्ता पत्नीचा शोध सुरू आहे.

Shocking
Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com