Shocking : अधिकाऱ्याने प्यायला मागितले पाणी, शिपायाने बाटलीतून पाजली लघवी; थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं!

Shocking Incident : आरडब्लूएसएस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शिपायाने लघवी पाजली. अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिपायाला अटक केली आहे.
Shocking Incident
Shocking Incidentx
Published On
Summary
  • एका सरकारी ऑफिसमध्ये धक्कादायक प्रकार घडला.

  • शिपायाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लघवी पाजली.

  • यानंतर तो अधिकारी आजारी पडला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

  • प्रकृती सुधारल्यानंतर अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Shocking News : RWSS म्हणजेच ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका शिपायाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लघवी पाजली. दोघेही रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत होते. तेव्हा शिपायाने हे घाणेरडे कृत्य केले. अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिपायाला अटक केली आहे. सदर घटना ओडिशाच्या गजपती जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलैच्या रात्री हा किळसवाणा प्रकार घडला. सहाय्यक कार्यकारी अभियंता गुरु प्रसाद पटनाईक आणि शिपाई सुभाषचंद्र बेहेरा हे आर. उदयगिरी येथील आरडब्लूएसएस कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत काम करत होते. पटनाईक यांनी शिपाई बेहेराकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा बेहेराने बाटलीतील पाण्याऐवजी लघवी बाटलीमध्ये दिल्याचा आरोप गुरु प्रसाद पटनाईक यांनी केला आहे.

Shocking Incident
Court Verdict : मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणी माजी खासदार दोषी; निकालानंतर कोर्टातच रडला

खोलीत पुरेसा प्रकाश नसल्याने आणि कामाच्या दबावामुळे मी बाटलीमध्ये नक्की काय आहे हे न तपासता प्यायलो, असे पटनाईक यांनी म्हटले आहे. काही वेळात पटनाईक यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांनी पाण्याची बाटली तपासून पाहिली. बाटलीतून घाणेरडा वास आल्याने त्यांनी शंका व्यक्त केली. तपासामध्ये, बाटलीमध्ये लघवी असल्याचे स्पष्ट झाले.

Shocking Incident
Beed : कृष्णा आंधळेचा खून, वाल्मिक कराडने २५ जणांची हत्या केली, माझ्याकडे पुरावे; बडतर्फ पीएसआयचा खळबळजनक दावा

आपण पाण्याऐवजी लघवी प्यायलो हे समजल्यानंतर पटनाईक यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना ताबडतोब बेरहमपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर पटनाईक यांची प्रकृती सुधारली आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिपाई बेहेराला अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य जाणूनबुजून केले? की जुन्या वैमनस्यातून केले? की त्यामागे काही मानसिक असंतुलनाचे कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Shocking Incident
Mahadevi Elephant : महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? वनतारा आणि नांदणी मठाधिपतींच्या बैठकीत काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com