Shocking: तरुणीचं लग्न ठरलं, संतापलेल्या मैत्रिणीनं पळवून नेलं; समिलिंगी संबंध कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

Punjab Shocking News: पंजाबमध्ये एका तरुणीने आपल्याच मैत्रिणीचं अपरहण केलं. मैत्रिणीचं लग्न ठरल्याचे कळताच तिने हे कृत्य केले. दोघींचे समलिंगी संबंध असल्याचे उघड झाले. पोलिस दोघींचा शोध घेत आहेत.
Shocking: तरुणीचं लग्न ठरलं, संतापलेल्या मैत्रिणीनं पळवून नेलं; समिलिंगी संबंध कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली
Punjab Shocking NewsSaam Tv
Published On

Summary -

  • लग्न ठरलेल्या तरुणीला तिच्याच मैत्रिणीने पळवून नेले

  • दोघींमध्ये समलिंगी संबंध असल्याची माहिती उघड

  • लग्न ठरल्याचे कळताच मैत्रिणीने दिली धमकी

  • पोलिसांकडून दोन्ही तरुणींचा शोध सुरू

मैत्रिणीचं लग्न ठरल्याचे कळताच तिच्याच मैत्रिणीने तिचे अपरहण केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली. या तरुणींचे समलिंगी संबंध होते. लग्नाच्या आधी मुलगी पळून गेल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस सध्या या दोघींचा शोध घेत आहेत. या घटनेची पंजाबमध्ये चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारण जिल्ह्यातील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला मुरादपुरा येथे ही घटना घडली. यामधील एका तरुणीचे लग्न १४ जानेवारी रोजी होणार होते. लग्न होण्यापूर्वी समलिंगी संबंध असलेल्या मैत्रिणीने तिला पळून गेली. या याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आपल्या मुलीचे तिच्याच मैत्रिणीने अपरहण केल्याचा आरोप केला. त्या एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होत्या. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

Shocking: तरुणीचं लग्न ठरलं, संतापलेल्या मैत्रिणीनं पळवून नेलं; समिलिंगी संबंध कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली
Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

तरुणीच्या आईने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत असे लिहिले की, माझ्या मुलीला तिच्याच मैत्रिणीने पळवून नेले. माझ्या मुलीला तिने घराबाहेर बोलावून पळवून नेले. माझ्या मुलीचे लग्न १४ जानेवारी रोजी तरन तारन येथील एका तरुणाशी होणार होते. पण मुलगी पळून गेल्याचे कळताच मुलाच्या कुटुंबाने लग्न करण्यास नकार दिला. माझी मुलगी आणि तिची मैत्रिण नववी ते बारावीपर्यंत एकत्र शिकले. अभ्यासादरम्यान त्यांची मैत्री झाली. त्या मुलीने मुलांसारखी हेअरस्टाईल केली होती. ती बऱ्याचदा आमच्या घरी यायची. त्या दोघी बऱ्याचदा एकत्र असायच्या. ती आम्ही राहतो त्याच परिसरात राहत असल्यामुळे सुरूवातीला कुणाला संशय आला नाही.

Shocking: तरुणीचं लग्न ठरलं, संतापलेल्या मैत्रिणीनं पळवून नेलं; समिलिंगी संबंध कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली
Shocking : अंघोळ करताना श्वास कोंडला, बड्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न १४ जानेवारी रोजी होणार होते. नातेवाईकांमध्ये लग्नाची पत्रिका वाटली जात होती. माझ्या मुलीचे लग्न ठरल्यानंतर त्या मुलीला प्रचंड राग आला. तिने माझ्या मुलीला अनेकदा धमकी दिली की, जर तू लग्न केले तर याचे गंभीर परिणाम होतील. या धमक्यानंतर ती माझ्या मुलीला घेऊन पळून गेली. मुलगी पळून गेल्याचे कळताच आम्ही दोघींचा शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीत.

दरम्यान, तरनतारन शहर पोलिस ठाण्याचे एसएचओ अमरिक सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कायद्याच्या कक्षेत राहून सर्व पैलूंची चौकशी केली जाईल. मुली सापडल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवले जातील.

Shocking: तरुणीचं लग्न ठरलं, संतापलेल्या मैत्रिणीनं पळवून नेलं; समिलिंगी संबंध कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली
Shocking : मामानं भाचीचे अश्लील व्हिडिओ नवऱ्याला पाठवले, बघूनच हादरला, उचललं टोकाचं पाऊल!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com