Mans Private Parts Severed by Unknown Attacker in Sleep
Mans Private Parts Severed by Unknown Attacker in SleepSaam Tv

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Mans Private Parts Severed by Unknown Attacker in Sleep: प्रयागराजमध्ये भयंकर घटना घडली. २० वर्षीय तरूणाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल.
Published on
Summary
  • २० वर्षीय तरूणाचे गुप्तांग कापून पळ काढला.

  • धारदार हत्याराने कृत्य करून फरार.

  • पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.

उत्तर प्रदेश प्रयागराज जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं तरूणाचे गुप्तांग कापून पळ काढला आहे. तरूण घरी झोपलेला असताना अज्ञात आरोपीनं हे कृत्य केलं. तरूणानं तातडीने भावाच्या खोलीत धाव घेतली. नंतर तो रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध होऊन पडला. झोपेत घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. सध्या तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना मऊआइमा पोलीस स्टेशन परिसरात घडली. २० वर्षीय तरूण घरातच गाढ झोपेत होता. अज्ञात आरोपीनं येऊन तरूणाचे गुप्तांग कापले. धारदार चाकूने गुप्तांग कापून अज्ञात आरोपीनं घरातून पळ काढला. तरूण खडबडून जागा झाला. वेदनेनं विव्हळत होता. मात्र, त्याला घटनास्थळी कुणीही दिसले नाही.

Mans Private Parts Severed by Unknown Attacker in Sleep
शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

यानंतर तरूणानं भावाच्या खोलीत धाव घेतली. नंतर बेशुद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच जवळपास लोकांची गर्दी जमली. परंतु, आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यानंतर मऊआइमा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.

Mans Private Parts Severed by Unknown Attacker in Sleep
धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु अद्याप पोलिसांना आरोपी सापडलेला नाही. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूण अविवाहित होता. पाच भाऊ आणि दोन बहिणींमध्ये तो लहान होता. घटनेच्या दिवशी तो वेगळ्या खोलीत झोपला होता. माहिती मिळताच त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com