
जर्मन महिलेचे क्लाउड स्टोरेज हॅक होऊन खासगी फोटो-व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले.
सर्च इंजिन कंपनीवर गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करून महिलेने खटला दाखल केला.
या घटनेमुळे महिलेचे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर दोन्ही संकटात आले.
Shocking News : एका सर्च इंजिन कंपनीच्या विरोधात एका जर्मन महिलेने खटला दाखल केला आहे. महिलेने कंपनीवर गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि काही खासगी व्हिडीओ तिच्या क्लाउड स्टोरेजमधून चोरीला गेले. ते आता सर्च रिझल्टमध्ये दिसत आहेत, असे जर्मन महिलेने म्हटले आहे. क्लाउड स्टोरेजवर व्हिडीओ, फोटोसह अन्य डेटा साठवला जातो, या महिलेचा हा डेटा चोरीला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तिचे फोटो, व्हिडीओ काढून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तिच्या अडचणी आणखी वाढत गेल्या. आता लोकांनी सर्च इंजिन कंपनीच्या विरोधात एक मोठी मोहीम सुरु केली आहे. लोकांच्या खासगी आयुष्याचे, गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोटो, व्हिडीओ सर्च रिझल्टला दिसू लागल्याने महिलेने कंपनीच्या विरुद्ध खटला दाखल केला आहे.
पीडित महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडीओ तिच्या आयडीसह तिच्या वैयक्तिक क्लाउड स्टोरेजवरुन चोरीला गेले. त्यानंतर हे फोटो, व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर पोस्ट करण्यात आले. यामुळे महिलेच्या नावाने तिला, तिच्या फोटो किंवा व्हिडीओंना लोक शोधू लागले. महिलेने सर्च रिझल्टमधून तिची माहिती काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
महिलेच्या फोटो आणि व्हिडीओवर सर्चवर २००० हून अधिक यूआरएल दिसत आहेत असा आरोप जर्मन महिलेने केला आहे. तिच्या तक्रारींनंतर सुरुवातीला काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या. या घटनेमुळे मला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर झाला असे महिलेने म्हटले आहे. त्रासलेल्या महिलेला तिची नोकरी बदलावी लागली, दुसऱ्या ठिकाणी राहायला जावे लागले, अशी माहिती डेर स्पीगल वृत्तपत्राने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.