Air Conditioner Blast News : उन्हाचा कडाका वाढला की प्रत्येकाला एसीच्या (Air Conditioner) थंडगार हवेचे सुख हवेहवेसे वाटू लागते. घरात, ऑफिसात आणि चारचाकी गाडीमध्ये एसी लावला जातो. पण हाच एसी जीवावर उठला आहे. होय... हरियाणामध्ये एसीमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.
हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील बहादुरगढमध्ये एका घरात एसीच्या कॉम्प्रेसचा अचनक घरात स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतामध्ये महिला आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाल आहे. एसीच्या कॉम्प्रेसरचे एकामागे एक दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की टाइलही उखडल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामन दलाला पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर बचावकार्य करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
स्फोटानंतर घराला आगीने गिळले -
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सेक्टर ९ मधील ३१२ क्रमांकाच्या घरात रात्री अचानक धमाका झाल्याचा आवाज आला, त्यानंतर भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक दोन स्फोट झाले. आवाज खूप मोठा होता. दुसऱ्या धमाक्यामुळे आग अधिकच भीषण लागली. शेजारच्यांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
घरात भीषण आग लागली होती, सगळीकडे धूर अन् भयंकर आग असल्यामुळे अग्निशामन पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अग्निशामन दलाला घरात चार जणांचे मृतदेह होरपळलेल्या अवस्थेत आढळले.
मृतक सर्व दिल्लीचे -
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. या दुर्घटनेत हरपाल नावाचा एक व्यक्ती वाचलाय, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरपाल सात महिन्यापूर्वी पत्नी आणि मुलांसोबत रेंटच्या घरात राहण्यासाठी आला होता. हे कुटुंब दिल्लीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
घात की अपघात -
घरातील एलपीजी सिलेंडर व्यवस्थित आहेत. एसीच्या इंडोर युनिटला आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून दिसतेय. पण हा ब्लास्ट दुसऱ्या ज्वलनशील पदार्थामुळेही झालेला असू शकतो, असा संशय आहे. घरात ज्वलनशील पदार्थ कुठून आला? याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, एसीचा कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळेच स्फोट झाल्याचं समजतेय. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
नोट - घरात एसी वापरताना काळजी घ्यावी. ठरावीक काळानंतर एसी तपासून पाहावा, अन्यथा अशा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.