Shivsena News : संसदेतील अविश्वास ठरावाला शिवसेनेतर्फे खासदार श्रीकांत शिंदे विरोध करतील

Political news : विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देत श्रीकांत शिंदे मोदी सरकारच्या बाजूने मत मांडतील.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSaam Tv
Published On: 

Mumbai News : शिवसेना संसदीय पक्षाने लोकसभेत येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाविरोधात बोलण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नेमणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाविरोधात डॉ. शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडतील.

विरोधकांच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेतर्फे पक्षाची बाजू मांडण्याची संधी शिवसेना संसदीय पक्षाने डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली आहे. युपीए सरकारच्या कालावधीत देशाची सर्व पातळ्यांवर झालेली अधोगती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 9 वर्षांच्या काळात देशाची झालेली प्रगती व विकासकामे याबाबत संसदेत माहिती देऊन खासदार श्रीकांत शिंदे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील. (Latest Marathi News)

Shrikant Shinde
Delhi Services Bill: केजरीवाल यांना मोठा धक्का, दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला अनेक आघाड्यांवर अपयशाला सामोरे जावे लागल्याचा आरोत शिंदे गटाकडून केला जातो. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने केलेल्या कामांकडे देखील श्रीकांत शिंदे सभागृहाचे लक्ष वेधतील. (Political News)

Shrikant Shinde
Rahul Gandhi No Confidence Motion: राहुल गांधीची तोफ उद्या धडाडणार, मोदी सरकारविरोधीत अविश्वास प्रस्तावावर काय बोलणार?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा ठराव स्वीकारला आहे. त्यावर उद्या होणाऱ्या चर्चेत श्रीकांत शिंदे शिवसेनेची भूमिका मांडतील. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देत श्रीकांत शिंदे मोदी सरकारच्या बाजूने मत मांडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.