7 ग्राहकांची गोळ्या झाडून हत्या करणारी सेक्स वर्कर पुन्हा चर्चेत

सात जणांच्या हत्येप्रकरणी आयलिन वुर्नोसला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
7 ग्राहकांची गोळ्या झाडून हत्या करणारी सेक्स वर्कर पुन्हा चर्चेत
7 ग्राहकांची गोळ्या झाडून हत्या करणारी सेक्स वर्कर पुन्हा चर्चेत Saam TV
Published On: 

अमेरिकेतील मिशिगनमध्ये जन्मलेल्या आयलिन वुर्नोसचे नाव नेटफ्लिक्सवरील चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. सात जणांच्या हत्येप्रकरणी आयलिन वुर्नोसला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सेक्स वर्कर आयलिन वुर्नोसने तिच्या 7 ग्राहकांना गोळ्या घालून ठार केले होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर अनेक यूजर्स त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. आयलीन वुर्नोसची कथा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वास्तविक, आयलीन वुर्नोसचा जन्म 1956 मध्ये झाला होता. आयलीन वुर्नोसचे आईवडील तिच्या जन्मापूर्वी वेगळे झाले होते. जेव्हा ती चार वर्षांची होती, तेव्हा तिला आणि तिच्या भावाला त्यांच्या आजी-आजोबांकडे राहायला पाठवण्यात आले. तिने किशोरवयातच शाळा सोडली आणि नंतर ती सेक्स वर्कर बनली.

7 ग्राहकांची गोळ्या झाडून हत्या करणारी सेक्स वर्कर पुन्हा चर्चेत
ST कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर कर्मचाऱ्याच्या मुलाचं रॅप साँग; पाहा Video

अहवालानुसार, 1989-1990 मध्ये आयलिन वुर्नोसने फ्लोरिडामध्ये सात जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हे लोक तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि या सर्व हत्या स्वसंरक्षणार्थ केल्याचा दावा करण्यात आला होता. तिच्याकडे सात जण ग्राहक म्हणून आले. प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यानंतर, आयलीन वुर्नोसला अखेरीस सात पुरुषांपैकी सहा जणांना ठार मारल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 2002 मध्ये आयलिन वुर्नोसचा विष इंजेक्शनने मृत्यू झाला होता.

आयलीन वुर्नोसच्या मृत्यूच्या 19 वर्षांनंतर तिचे नाव नेटफ्लिक्सवरील चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आयलीन वुर्नोसचा दुसरा भाग गुन्ह्याच्या आसपासच्या घटना दर्शवितो. ज्यावर अनेक यूजर्सनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणतात की आयलीनला अन्यायकारक वागणूक दिली गेली असावी, म्हणूनच तिने 7 लोकांची हत्या केली.

तथापि, कागदपत्रांनुसार हत्येपूर्वी आयलीनला अनेक वेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर प्राणघातक हल्ला, सशस्त्र दरोडा, कार चोरी, अटकेचा निषेध, बनावटगिरी, दारू पिऊन गाडी चालवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडे बंदूकही होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com