Gujarat Bus Accident: गुजरातच्या वलसाडमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली

Gujarat valsad bus accident: गुजरातच्या वलसाडमधून अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. गुजरातच्या वलसाडमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली.
Gujarat Bus Accident
Gujarat Bus AccidentSaam tv
Published On

Gujarat Bus Acciden News:

गुजरातच्या वलसाडमधून अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. गुजरातच्या वलसाडमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

गुजरातच्या वलसाडमधील सदद्वेरा(Sadadvera) परिसरात बस अपघाताची भीषण घटना घडली आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धरमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात ६ विद्यार्थी गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी भरलेली बस खोबा गावाच्या दिशेने जाताना सदद्वेरा गावात उलटली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाल्यानंतर गावातील लोक मदतीसाठी धावले. या अपघातात ६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांना धरमपूर गावातील रुग्णालयात दाखल केलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० विद्यार्थी होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com