काँग्रेसवर कोसळला दु:खाचा डोंगर; माजी केंद्रीय मंत्र्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

mohsina kidwai Death : काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी केंद्रीय मंत्र्याचं निधन झालं आहे.
mohsina kidwai passes away
mohsina kidwai Death Saam tv
Published On
Summary

विधानसभा निवडणुका सुरू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या किदवई यांचं निधन

किदवई यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

देशात ५ राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असतानाच काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ खासदार मोहसिना किदवई यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे.९४ वर्षीय मोहसिना यांनी बुधवारी पहाटे ४ वाजता रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मोहसिना यांनी काँग्रेस पक्षात अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोहसिना किदवई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन बुधवारी दुपारी ३ वाजता नोएडा येथील त्यांच्या राहत्या घरी करता येईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता निजामुद्दीन स्मशानात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक, समर्थक आणि विविध राजकीय नेते पोहोचण्याची शक्यता आहे.

मोहसिना किदवई भारतातील वरिष्ठ राजकीय नेत्या होत्या. त्यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये समावेश केला जायचा. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावली. त्यांनी महिला नेत्या म्हणून देशभर एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मोहसिन किदवई यांचा जन्म १९३२ साली झाला होता. त्यांचं देशातील महत्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांच्या नावाची गणना केली जायची. त्या अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेत देशाचं नेतृत्व केलं आहे.मोहसिना किदवई यांनी केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी केंद्रात शहर विकास, पर्यटन, आरोग्य या मंत्रालयाचे कामकाज सांभाळलं होतं. राजकारणात महिलांचा सहभाग कमी होता, त्या काळात किदवई यांची राजकारणात एन्ट्री झाली होती.

mohsina kidwai passes away
निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

किदवई यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही 'एक्स'वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. 'मोहसिना किदवई यांच्या निधनाची वार्ता दु:खद आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ आणि प्रामाणिक नेत्या होत्या. त्यांनी आयुष्यभर जनसेवा केली. त्यांनी साधेपणा, सौम्यता, सन्मानजनक राजकीय यशामुळे देशातल्या अनेक पिढ्यांतील महिलांना प्रेरणा दिली आहे. या दुःखदप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com