Rajasthan: गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची वडिलांना सुसाईड नोट

राजस्थानमधील बाडमेरमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली
Rajasthan: गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची वडिलांना सुसाईड नोट
Rajasthan: गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची वडिलांना सुसाईड नोटSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरमध्ये (Barmer)१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Girl) सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्काराच्या तयारी दरम्यान हे संपूर्ण प्रकरण समोर आले. यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

अल्पवयीन मुलीचे नातेवाईक जेव्हा मुलीवर अंत्यसंस्कार (Funeral) करण्याकरिता जात होते, तेव्हा मुलीच्या कपड्यांमध्ये एक कागद सापडला. ज्यामध्ये घटनेचे संपूर्ण वर्णन आणि आरोपींची (accused) नावे लिहिली आहेत. यानंतर पोलिसांना (police) माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी नातेवाईकांकडून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. बाडमेर (Barmer) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे (abuse) हे प्रकरण असून त्यामध्ये एक आरोपी अल्पवयीन आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिको परिसरात राहणारी १६ वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिलांबरोबर राहत होती. आत्महत्येच्या दिवशी रात्री मुलीचे कुटुंबीय (Family) बाहेर गेले असता, मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, अंत्यसंस्कार करताना सापडलेल्या सुसाईड नोटवरून कुटुंबाला संपूर्ण घटनेची माहिती मिळाली आहे, त्यानंतरच कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र सिंह आणि एका अल्पवयीन मुलाने रविवारी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे आणि कोणालाही सांगितल्यास कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देखील तिला देण्यात आली आहे. मुलीकडे एक पानाची सुसाईड नोट सापडली आहे, त्यात लिहिले आहे की, मी मरणार आहे, माझ्या सर्व वस्तू कोणाला देखील देऊ नका, मला मरायचे नाही, पण काय करु? लोक माझ्या वडिलांना ऐकवतील. माझी स्वप्ने अजून देखील अपूर्ण आहेत.

Rajasthan: गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची वडिलांना सुसाईड नोट
Mahad: महिला सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर

महेंद्र आणि त्याच्या मित्राने खोटे बोलून बाहेर बोलावले आणि माझी बदनामी केली आहे. मुलीने पुढे लिहिले की, माझ्या आई आणि वडिलांना कोणी काही बोलू नका. पापा मला माफ करा आणि माझे कपडे आणि सर्वकाही योग्य ठिकाणी ठेवा. मी काही चुकीचे केले नाही...तुमची मुलगी.. माझ्या मृत्यूचे कारण महेंद्र आणि त्याचा मित्र आहे.

सुसाइड नोट (Suicide note) सापडल्यावर कुटुंबीयांनी पोलिसामध्ये गुन्हा दाखल केला आहे. जिथे पोलिसांनी हा सामूहिक बलात्कार मानून पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला कक्षाचे एएसपी हजारीराम करत आहेत. सध्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com