

नवी दिल्ली: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षा दलाने त्याला रोखले आणि ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने ही माहिती दिली. प्राथमिक तपासानुसार तो मानसिक आजारी आहे आणि भाड्याने गाडी चालवत होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. सध्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम त्याची चौकशी करत आहे. (Man detained for trying to enter NSA Ajit Doval's house, say Delhi police sources)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेली व्यक्ती आपल्या शरीरात चिप टाकण्यात आल्याचे वारंवार सांगत होता. त्याला रिमोटने नियंत्रित केले जात आहे असंही तो म्हणत होता. मात्र, तपासात त्याच्या शरीरात कोणतीही चिप आढळून आली नाही. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बेंगळुरु (Bangalore) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांचे दहशतवादविरोधी युनिट, स्पेशल सेल त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत.
डोवाल दहशतवादी संघटनांच्या रडारवर
अजित डोवाल (Ajit Doval) यांना भारताचे जेम्स बाँड समजले जातात. ते पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) च्या डोळ्यात आता खुपू लागले आहेत. डोवाल हे अनेक दहशतवादी संघटनांचेही लक्ष्य आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जैशच्या एका दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी करण्याचा व्हिडीओ आढळून आला होता. त्यानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.