

राजस्थानच्या एसडीएम काजल मीना यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप
६०,००० रुपयांची लाच घेतली
लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने केली कारवाई
राजस्थानच्या एसडीएम काजल मीना या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत टॉपर राहिलेल्या काजल मीना यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. पहिल्याच पोस्टिंगदरम्यान त्यांना लाच घेतला आरोप करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आले आहेत. पहिल्याच नियुक्तीदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल मीना यांनी एका जमीनसंबंधित हुकूमनामा जारी करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने ही कारवाई केली आहे. काजन मीना यांच्यासोबत सहकारी प्रवीण आणि दिनेश यांना पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजल मीना यांच्यावर ६०,००० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. एकूण ६० हजार रुपये घेतले होते. यातील एसडीएमसाठी ५०,००० तर सहकाऱ्यासाठी १०,००० रुपये घेतल्याच्या आरोप आहे.
एसबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, सुरुवातीला १ लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर ही रक्कम ५०,००० रुपयांवर आणली. तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला. छापा टाकण्यात आला. आरोपीकडून ४ लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्याचा तपास सुरु आहे.
काजल मीना आहेत तरी कोण? (Who Is SDM Kajal Meena)
काजल मीना या २०२४ च्या बॅचच्या आरएएस अधिकारी आहेत. त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेत एसटी प्रवर्गातून रँक मिळवली होती. त्यांनी आयआयटी मंडी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक केले. यानंतर ईपीएफओ, दूरसंचार विभागात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.